चौसाळा पाठोपाठ मुळुकवाडी येथे दिवसा चोरी ; पावणे तीन लाखांचा ऐवज लंपास ..
एसपी साहेब चौसाळा व लिंबागणेश येथे पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढणार का?
लिंबागणेश प्रतिनीधी – हरिओम क्षीरसागर
बीड तालुक्यातील मौजे. मुळुकवाडी येथील कवली वस्ती वर घरात कोणी नसल्याचे पाहून दिवसा दुपारी ४ ते ६ च्या दरम्यान चोरीची घटना घडली असुन चोरट्यांनी कपाटातील रोख २५ हजार रुपये आणि ४ तोळ्याचे मंगळसुत्र असा एकुण पावणे ३ लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवल्याचे घरमालक मुरलीधर दिनानाथ ढास वय ८३ व सौ.कौशल्याबाई मुरलीधर ढास यांनी सांगितले.
दोघेही आज दुपारी ३ वाजता बेनसुर येथे धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते.सायंकाळी साडे सहा वाजता घरी आले असता पत्र्याच्या घराच्या दोन्ही खोल्यांचे कुलुप तुटल्याचे दिसुन आले.घरात कपाटातील कपडे अस्ताव्यस्त पडलेले दिसुन आले. बालाघाटावर चोरयाचे प्रमाण वाढले असल्याचे दिसुन येते परवाच चौसाळा येथे दिवसा ढवळया चोरी झाली आहे
नेकनुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असुन याकडे नेकनुर पोलीसांचे दुर्लक्ष होत असुन नेकनुर पोलीस स्टेशनला कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक देण्याची मागणी सर्वसामान्य जनतेतुन होत असतानाही याकडे दुर्लक्ष का ? असा प्रश्न उपस्थीत होत आहे
चौसाळा पोलीस चौकीचा कारभार चार कर्मचाऱ्यावरती तर लिंबागणेश चा कारभार तीन कर्मचाऱ्यावरती चालत असुन पोलीस संख्या वाढविण्याची मागणी देखील जोर धरत असुन चौसाळ्यानंतर चोरटयांनी आपला मार्ग लिंबागणेश परिसरात वळवला असल्याचे दिसुन येत आहे .
——-
लिंबागणेश करांच्या वतीने रात्रपाळीला देखील कर्मचारी असावा किंवा द्यावा असे लेखी निवेदन देणार – *हरिओम क्षीरसागर*