27.5 C
New York
Monday, June 17, 2024

Buy now

शेवगाव चे पी.आय. विलास पुजारी यांची तडकाफडकी बदली शेवगाव पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक श्री. दिगंबर भदाणे यांची नियुक्ती १ डिसेंबर रोजी रात्री स्वीकारला कारभार

शेवगाव चे पी.आय. विलास पुजारी यांची तडकाफडकी बदली शेवगाव पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक श्री. दिगंबर भदाणे यांची नियुक्ती १ डिसेंबर रोजी रात्री स्वीकारला कारभार*

*शेवगाव प्रतिनिधी:- दत्तात्रय वाघ*
पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी शुक्रवारी सायंकाळी काढलेल्या आदेशानुसार शेवगाव पोलीस निरीक्षक पदी दिगंबर भदणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याअगोदर पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्याकडे शेवगाव पोलिस ठाण्याचा पदभार होता. विलास पुजारी यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आली दोन वर्षे ते शेवगाव पोलिस ठाण्याचा चार्ज पुजारी यांच्या कडे होता. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. त्यात त्यांचेही नाव असल्याचे समजते. परंतु, त्यापूर्वी पुजारी यांची नियंत्रण कक्षात रवानगी करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक दिगंबर भदणे यांची अहमदनगर येथील ट्रायल मॉनेटरिंग सेलचे (दोष सिद्धी शाखा) विभागात नियुक्ती होती.
विलास पुजारी यांची 1 डिसेंबर 2023 रोजी तडकाफडकी बदली करण्यात आली त्यांच्या जागी नाशिक जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले श्री दिगंबर भदाणे यांची नियुक्ती करण्यात आली शेवगाव शहरातील विविध सामाजिक संघटना राजकीय पक्ष यांनी नवनियुक्त पी.आय. दिगंबर भदाणे शेवगाव यांचे हारतुरे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी छावा क्रांतिवीर सेने शेवगाव तालुकाध्यक्ष तथा पत्रकार दत्तात्रय वाघ ,प्राध्यापक किसन चव्हाण सर, शेख प्यारेलाल भाई, नितीन खंडागळे, पत्रकार,सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना नवनियुक्त पीआय साहेब यांनी शेवगाव शहरासह तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्था तसेच सामाजिक सलोखा ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या