पिंपळनेर सर्कलचा ढाण्या वाघ शिवसेना जिल्हाप्रमुख परमेश्वर (सर) सातपुते :-युवापत्रकार समद शेख ताडसोन्ना
बीड: गेल्या आनेक वर्षांपासून शिवसेनेच्या लहान मोठ्या पदावर काम करताना परमेश्वर सातपुते सर यांनी शिवसैनिक म्हणून काम केले. शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर त्यांना आमिशे दाखवण्यात आली.परंतु त्यांनी ठाकरे कुटुंब आणि खऱ्या शिवसेनेवरची निष्टा ढळु दिली नाही. यांचे फळ त्यांना मिळाले आसुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे व वरिष्ठ नेत्यांनी परमेश्वर सातपुते सर यांची शिवसेना जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. परमेश्वर सातपुते सर हे छोट्या गावातुन व आणि चळवळीतुन पुढे आलेला कार्यकर्ता आहे.त्यांनी कायम प्रस्थांपितांशी संघर्ष केला आहे.सामान्य कुटुंबातुन पुढे येत सरपंच बनलेला परमेश्वर सातपुते सर शिवसैनिक म्हणून शिवसेनेत दाखल झाले.त्याचे काम पाहुन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,युवासेनाप्रमुख
आदित्या ठाकरे व वरिष्ठ नेत्यांनी किसान सभेच्य जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी सोपवली.किसान सभेच्या माध्यमातून अनेक शेतकर्यांना शिवसेनेशी जोडले.दरम्यान त्यानी शिवसेना जिल्हाप्रमुख पद मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. ते मिळाले नाही.म्हणून नाराज न होता
परमेश्वर सातपुते सर यांनी निष्टा जपली.युवापत्रकार समद शेख ताडसोन्ना