नानासाहेब औटे सरपंच यांच्या वाढदिवसानिमित्त नांदा जि.प.प्राथमिक शाळेमध्ये शालेय साहित्य वाटप
आष्टी प्रतिनिधी/ किरण जावळे सर
नांदा गावाचे विद्यमान सरपंच नानासाहेब औटे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा प्राथमिक शाळा नांदा येथे मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
नानासाहेब पंडितराव औटे यांच्या दरवर्षी विविध उपक्रम राबवत वाढदिवस साजरा केला जातो याही वर्षी नांदा येथील शाळेतील मुलांना शालेय साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.नाानासाहेब औटे यांच्या वाढदिवसानिमित्त जि.प प्राथमिक शाळेच्या वतीने त्यांच्या सत्कार करण्यात आला.यावेळी शिंदे सर,सरोदे सर,शालेय समिती अध्यक्ष ढोबळे पाटील,पत्रकार किरण जावळे सर,संजय श्रीधर औटे,उपसरपंच बजरंग औटे,व शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..
चौकट
वाढदिवस दरवर्षी सामाजिक उपक्रमानेच – नानासाहेब औटे सरपंच
गेल्या चार वर्षापासून नानासाहेब औटे यांच्या वाढदिवसानिमित्त समाज हिताचे विविध उपक्रम घेत वाढदिवस साजरा करत आहोत याही वर्षी आम्ही नांदा येथील प्राथमिक शाळेमध्ये शालेय साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा केला. यापुढे देखील असेच विविध उपक्रम घेऊन वाढदिवस साजरा करत राहू.
अशी माहीती सरपंच नानासाहेब औटे यांनी प्रसार माध्ममांशी बोलताना सांगीतली