12.3 C
New York
Wednesday, March 26, 2025

Buy now

spot_img
spot_img

धारूर तालुक्यात गावंदरा येथे दोन ठिकाणी घर फोडी उपसरपंचाच्या घरी घरफोडी करत कुटुंबीयांना मारहान

*धारूर तालुक्यात गावंदरा येथे दोन ठिकाणी घर फोडी उपसरपंचाच्या घरी घरफोडी करत कुटुंबीयांना मारहान*

 

 

भोगलवाडी (प्रतिनिधी)

 

धारूर तालुक्यातील गावंदरा येथे दि. ०१/१२/२०२३ वार शुक्रवार रोजी मध्यरात्री ०२ च्या दरम्यान गावंदरा येथे दोन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत या दरम्याण गावचे उपसरपंच बिभिषण बडे यांच्या घरी चोरीची घटना घडली आहे.

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की धारूर तालुक्यातील गावंदरा येथे शुक्रवार रोजी रात्रीच्या मध्य रात्री ०२ दरम्यान उपसरपंच बिभिषण बडे यांच्या घरी चोरी करत त्यांचे चुलते बीड जिल्हा मध्यवर्तीचे मा.उपाध्यक्ष सुदामराव बडे यांच्यावर हल्ला केला असुन त्यांना चेहऱ्यावर गंभीर दुखतात झाली आहे त्यांच्या वर बीड येथे खाजगी रुग्नालयात उपचार घेण्यात आले याबाबत धारूर पोलीस व बीड पोलीस यांनी गावंदरा येथील या चोरी प्रकरणी भेट देऊन पंचनामा केल्याचे समजते या चोरीच्या घटनेमुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले असुन या घटनेतील चोरांचा शोध घेण्याचे आवाहन बीड व धारूर पोलीसा समोर आहे.

 

 

चौकट : हा प्रकार गंभीर असुन या प्रकरणी धारूर पोलीसा कडून रात्रीच्या वेळी गस्त घालण्याची मागणी गावंदरा ग्रामस्थातुन केली जात आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या