*रस्त्यावर गतीरोधक नसल्याने विद्यार्थ्यांना करावा लागत आहे जीव मुठीत घेऊन प्रवास…*
हुले कन्स्ट्रक्शनचे दुर्लक्ष..
लिंबागणेश प्रतिनीधी – हरिओम क्षीरसागर
बीड तालुक्यात असणारे लिंबागणेश गाव हे तिर्थक्षेत्र म्हणुन संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तसेच आता लिंबागणेश लगत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ वर लिंबागणेश गाव लागत असुन भालचंद्र विद्यालय रस्त्या लगत असुन शाळेची पट संख्या हि २००० ते २५०० असुन गावात जिल्हा परिषद शाळा आहे आणि जिल्हा परिषद शाळेतील मुले हि जास्त समजदार तसेच बालिश असतात. त्यामुळे त्यांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे. याआधी गावातील ग्रामस्थांनी अनेक आंदोलने, रस्ता रोको केला. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. कारण वैद्यकीनी जवळ रस्त्यावरील असणारा टोलनाका एक वर्षापासून चालू झालेला असून ते बाकी कुठल्याही नियमाचे पालन करीत नाहीत गावा जवळील असणारे लाईट देखील आणखीन बंदच आहेत आणि गावासमोरील डिव्हायडर जवळील स्वच्छता देखील ते करत नाहीत. त्यामुळे गावातील ग्रामस्थांचा रोष वाढत आहे. त्यामुळे संबंधित कन्स्ट्रक्शन लवकरात लवकर शाळेजवळ व गावाजवळ गतिरोधक बसवावे अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.