7.1 C
New York
Saturday, November 9, 2024

Buy now

spot_img
spot_img

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची भरपाई तात्काळ द्यावी -छावाक्रांतीवीर सेना शेवगाव.

 

*अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानाची शासनाने तात्काळ भरपाई द्यावी :- छावा क्रांतीवीर सेना शेवगाव*

शेवगाव  प्रतिनिधी- अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानाची शासनाने तात्काळ भरपाई मिळावी आशयाने निवेदन छावा क्रांतिवीर सेना (संस्थापक अध्यक्ष) करण भाऊ गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली छावा क्रांतिवीर सेना शेवगाव तालुका च्या वतीने शेवगाव तहसील येथे देण्यात आले.

निवेदनात म्हटले की,शेवगाव तालुक्यासह संपूर्ण नगर जिल्ह्यात दिनांक 27 व 28 नोहेंबर रोजी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला.ह्या अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांच्या हाता तोंडाशी आलेल्या पिकाचे नुकसान झाले आहे.अवकाळी पावसामुळे रब्बी तील हरभरा, गहू, तूर, सोयाबीन आणि भाजीपाला पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरले आहे.बी बियाणे,औषधी यावर भरमसाठ खर्च करून हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे गेला आहे.त्यामुळे शेतकरी आर्थिक व मानसिक दृष्ट्या कमजोर झाला आहे.

कधी अवकाळी पावसाने तर कधी अस्मानी संकट शेतकरी बांधवांची पाठ सोडायला तयार नाहीत.त्यामुळे शेतकरी बांधव अक्षरशः मेटाकुटीला आला आहे.त्यामुळे सरकाने आता शेतकऱ्यानं वाऱ्यावर सोडू नये तर शेतकरी बांधवांच्या भक्कम पाठीशी उभा राहून मदत करण्याची गरज आहे.तरी सरकाने तात्काळ मदत जाहीर करावी नसता येत्या सात दिवसाच्या आत आपल्या कार्यालयासमोर शेतकरी बांधवाना सोबत घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला.यावेळी छावा क्रांतिवीर सेना शेवगाव तालुकाध्यक्ष दत्तात्रय वाघ,चंद्रकांत महाराज लबडे,मनोज वाघ, कानिफ दादा झिरपे, रामभाऊ झिरपे,राहुल दादा झिरपे, महेश झिरपे, विठ्ठल वाघ, प्रदीप झिरपे, शुभम झिरपे, लहू वाघ, संदीप झिरपे, संदीप हुलमुखे मंगरूळ, अंगत झिरपे, सरपंच आदिनाथ झिरपे, ज्ञानदेव कोरडे, सुभाष वाघ, ज्ञानेश्वर झिरपे, अमोल झिरपे, बाळासाहेब झिरपे,आदी छावा क्रांतिवीर सेना पदाधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या