बीड प्रतिनिधी – बीड शहरातील मिल्लीया शाळेतील अश्लील व्हिडीओ आणि ऑडियो प्रकरणात तीन महिला शिक्षिकांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. तर दोन शिक्षिकांनी स्वेच्छा निवृत्ती घेतल्याची माहिती अंजुमन ईशात ए तालीम या संस्थेच्या वतीने देण्यात आली. संस्था या प्रकरणात कोणालाही पाठीशी घालत नाही. आतापर्यंत जे दोषी आढळले आहेत त्यांच्यावर संस्थेने कडक करवाई केली आहे. त्यामुळे पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. आतापर्यंत जसे सहकार्य केले तसेच यापुढेही करावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.बीड शहरातील मिल्लीया शाळेतील एका शिक्षकाने केलेल्या प्रकरणी घाणेरड्या कृत्याप्रकरणी त्याच्या विरुद्ध यापूर्वीच संस्थेने सेवेतून निलंबनाची कारवाई केली आहे. त्यानंतर या प्रकरणात व्हिडिओआणि ऑडिओ संदर्भात आतापर्यंत जे जे कोणी दोषी आढळलेआहेत. त्यांच्यावरही कडक कारवाई करण्यात येत आहे. याप्रकरणात या शाळेतील तीन शिक्षिकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून दोन शिक्षिकांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे.संस्थेने कायदेशीर बाबी आणि पूर्ण चौकशी अंति यापूर्वीच एकाशिक्षिकेवर निलंबनाची कारवाई केली होती. त्यानंतर गुरुवार ता. 30नोव्हेंबर रोजी आणखी दोन शिक्षिकांना निलंबित करण्यात आलेअसून याचवेळी अन्य दोन शिक्षिकांनी स्वेच्छा निवृत्ती घेतल्याची माहिती संस्थेने दिली आहे. संस्थेने सुरुवातीपासूनच या प्रकरणात कायदेशीर कार्यवाही सुरू केली होती. त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात कोणाचीही गय करण्यातआलेली नाही. दोषी आढळले त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यातआलेली आहे. त्यामुळे पालकांनी, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता संस्थेला आणि शाळेला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित मिलीया स्कूलचे संचालक मंडळांनी हे निर्णय घेतल्यानंतर समाजसेवक मुस्लिम समाजातील नेतेमंडळी सामाजिक कार्यकर्ते विद्यार्थ्यांचे पालक यांनी संबंधित घटना फेसबुक व्हाट्सअप व सोशल मीडियावरती व्हायरल होत असताना आपल्या पाल्याला या शाळेमध्ये न पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे यामुळे संस्थेने हा निर्णय घेतलेला आहे तसेच संस्थेने आत्महत्या निर्णय का घेतला नाही असा सामाजिक कार्यकर्ते नेते मंडळी व पालकांचे म्हणणं आहे पण सायंकाळी महाराष्ट्र आरंभ असे आव्हान करत आहे की मी लिहा स्कूल ही मराठवाड्याची नवे तर महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माची शान आहे मिली हायस्कूलमध्ये अनेक विद्यार्थी अधिकारी घडून मोठ्या मोठ्या पदावरती गेलेले आहेत संबंधित प्रकरणांमध्ये काही लोक दोष आहेत पण यासोबत सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना सुद्धा त्रास झालेला आहे यामध्ये संस्थेचे नुकसान होऊ नये व विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे नुकसान होऊ नये संबंधित प्रकरणाला बाजूला ठेवून आपण सर्व जाती धर्मातील लोकांनी मिलीया हायस्कूलला व संस्थेला सर्व जाती धर्मातील शिक्षक वृद्ध या ठिकाणी हिंदू मुस्लिम धर्मातील शिक्षक आहेत तर या ठिकाणी विद्यार्थीही मोठ्या प्रमाणात आहेत म्हणून तर बीड जिल्ह्याची नव्हे तर मराठवाड्याची शान असलेल्या निधन वाचविण्यासाठी सर्व जाती-धर्माने पुढे येऊन एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी शिक्षण मिळत असल्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये या शाळेची ओळख आहे या शाळेला आपण सर्वांनी बीड जिल्ह्यातील जनतेतील सर्व जाती धर्मातील नेतेमंडळी सामाजिक कार्यकर्ते धर्मगुरू यांनी सोबत घेऊन दिल्याच्या पाठीशी उभा राहावे जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे व यापुढे मिलीया शाळा ही चांगल्या पद्धतीने चालेल अशी भावना आपण सर्वांनी सोबत ठेवून काम करावे असे आवाहन सायंकाळी महाराष्ट्र आरंभ वतीने करण्यात आले आहे