12.3 C
New York
Wednesday, March 26, 2025

Buy now

spot_img
spot_img

विद्यार्थिनींनी केले गांडूळ खत संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन

विद्यार्थीनींनी केले गांडूळ खता संदर्भात शेतकन्यांना मार्गदर्शन

 

प्रतिनिधी – कृषी विद्यापीठ पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय अकोला संचलित कृषी महाविद्यालय कोंघारा येथील सातव्या सत्राच्या विद्यार्थिनींनी कृषी कार्यानुभव या कार्यक्रमा अंतर्गत दातपाडी येथील शेतकऱ्यांना गांडूळ खता बद्दल मार्गदर्शन केले.

 

यामध्ये गांडुळ खत म्हणजे का? ? ते कसे बनवावे व तसेच गांडूळ खताचे फायदे हे शेतकऱ्यांना सांगण्यात आले व रासायनिक, औषधीचा वापर होत आहेत यामुळे जमिनीची सुपीकता व पीक उत्पादनात घट होत आहे त्यासाठी सेंद्रिय खतांचे महत्व शेतकऱ्यांना सांगितले त्यात गांडूळ खत हे उत्तम सेंद्रिय खतांपैकी एक आहे याच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता, पिकाची वाढ, शेतकऱ्यांसाठी मुबलक असं हे उत्कृष्ट खत आहे, यापुढील काळात भर देण्याची नितांत गरज आहे. अश्या प्रकारे गांडुळ खताचे महत्व सांगण्यात आले. या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालय कोंघारा येथील RAWE च्या विद्यार्थीनी रासेश्वरी जुमडे, सृष्टि गायमुखे, वैष्णवी काळे,वैष्णवी कोटकर, शर्वरी दासोडे यांनी माहिती सांगितली. यावेळी कृषी महाविद्यालयातील प्रा. ढेंबरे मॅडम यांचे मार्गदर्शन मिळाले.या वेळी कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सविता धोके मॅडम, रावे इन्चार्ज प्रा. येलोरे सर,कार्यक्रम अधिकारी प्रा.डी.आर.जाधव सर यांचे देखिल आम्हाला मार्गदर्शन मिळाले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या