25.6 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

spot_img
spot_img

पश्चिम महाराष्ट्रातून जायकवाडी धरणात पाणी न सोडल्यास मराठवाड्यातील शेतकरयांना घेऊन आमरण उपोषणाला बसणार -अशोक हिगे

पश्चिम महाराष्ट्रातून जायकवाडी धरणात पाणी न सोडल्यास मराठवाड्यातील शेतकऱ्यांना घेऊन आमरण उपोषण करणार -अशोक हिंगे पाटील

 

आष्टी ता. परतुर येथे वंचित बहुजन आघाडीचा भव्य कार्यकर्ता मेळावा संपन्न

 

प्रतिनिधी- आष्टी तालुका परतुर जिल्हा जालना या ठिकाणी अशोक हिंगे पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला, सर्वप्रथम आष्टी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करून रॅली काढण्यात आली या रॅलीचा समारोप डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह क्रांती भूमी या ठिकाणी करण्यात आला व याच क्रांती भुमित मेळाव्याला सुरुवात झाली. या मेळाव्याला प्रमुख उपस्थिती व प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील हे उपस्थित होते, यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा प्रभारी जितेंद्र सिरसाठ, विभागीय उपाध्यक्ष दीपक डोके, मुख्य संघटक महेश निनाळे, जालना जिल्हा कार्याध्यक्ष परमेश्वर खरात, परतुर तालुका अध्यक्ष रवींद्र भदर्गे कार्यक्रमाचे आयोजक प्रकाश मस्के,यावेळी प्रसंगी बोलताना अशोक हिंगे म्हणाले की सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी वंचित बहुजन आघाडी सातत्याने रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहे. यावर्षी मराठवाड्यात अत्यल्प पाऊस झाल्याने दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दिनांक 16 सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथील मंत्रिमंडळाच्या बैठकीवर धडक मोर्चा काढला होता. त्याची नोंद घेऊन शासनाला दुष्काळ जाहीर करून अग्रमी पिक विमा देण्यास भाग पाडले. एक ऑक्टोबर रोजी पश्चिम महाराष्ट्रा च्या धरणातून जायकवाडी धरणात पाणी समप्रमाणात म्हणजेच (साडे आठ टीएमसी) पाणी सोडावे या मागणीसाठी गोदावरी महामंडळाच्या कार्यासमोर धरणे आंदोलन केले होते. लेखी आश्वासन देऊनही अद्यापही पाणी सोडण्यास संपदा मंत्री देवेंद्र फडणवीस तयार नाही. हक्काचे पाणी मराठवाड्याला मिळावे यासाठी लवकरच शेतकऱ्यांना घेऊन आमरण उपोषण बसणार असल्याची माहिती अशोक हिंगे यांनी दिली. यावेळी कार्यकर्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडून साठी कार्यकर्त्यांनी संघटनात्मक बांधणी करून संघटन वाढवावे जिल्हा प्रभारी जितेंद्र शिरसाट, दीपक डोके, महेश निनाळे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

 

यावेळी बीडचे जिल्हा पदाधिकारी, धम्मानंद साळवे, भारत तांगडे, अंकुश जाधव, सचिन उजगरे, जिल्हा उपाध्यक्ष बाबुराव गोसावी जिल्हा महासचिव किशोर त्रिभुवन, चखाजी सुंदरे परतुर शहराध्यक्ष राहुल नाटकर मंठा तालुका अध्यक्ष सुभाष जाधव, कार्यक्रमाचे आयोजक सूत्रसंचालन शाहूजी आव्हाड यांनी आभार प्रदर्शन केले. मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

 

चौकट

 

आष्टी येथील मेळाव्या प्रसंगी भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये अशोक हिंगे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला यावेळी प्रवेश करणाऱ्या कार्यकर्ते चे स्वागत पुष्पहार शाल घालून करण्यात आले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या