20.4 C
New York
Friday, June 14, 2024

Buy now

लग्नाच्या सोयरिकीत न चुकता विचारला जाणारा प्रश्न

लग्नाच्या सोयरीकीत न चुकता विचारला जाणारा सरकारी प्रश्न म्हणजे “मुलगा कितवी शिकलाय”? बहुतांश ग्रामीण भागातली उत्तरे असतात बी.ए. एम.ए डी.एड. वगैरे वगैरे आणी काम काय करतोय तर मात्र उत्तर द्यायला एक तर गफलत होते किंव्हा मग स्पष्ट पणे शेती करतो अस सांगून वेळ मारून नेली जाते.याला कारण सुद्धा असच आहे आयुष्यातले उमेदीचे आणी स्वप्न दाखवणाऱ्या काळात जवळपास पाच- सात वर्ष उच्चशिक्षणात अगदी वेड्यासारखे अभ्यास,पुस्तक,परीक्षा आणी कोणती तरी नोकरी हाती लागेल या मनसुब्याने हा काळ शिक्षणापाई खर्च केला जातो.मात्र कालांतराने जेव्हा हे चक्र जेव्हा संपत आणी वास्तवाकडे वाटचाल होते तेव्हा मात्र मोठी किंमत मोजावी लागते,समाज म्हणून डिग्रीला किंमत उरत नाही तिथे बँक बॅलन्स ने व्यक्तिमत्व ठरवले जातात,मात्र या अवजड वाटणाऱ्या सत्याला नेमक जबाबदार आहे तरी कोण ? आपली उघड्या डोळ्यांनी आभाळा एव्हडी स्वप्ने बघणारी वृत्ती की उच्च शिक्षणाच चॉकलेट देऊन बेरोजगारीचे व्रण आपल्या पदरात टाकणारी शासकीय व्यवस्था ? खर तर “सुशिक्षित पण बेरोजगार” ही राज्याचीच न्हवे तर संपूर्ण भारताची एक विचित्र समस्या का आहे भारतातील “सुशिक्षित बेरोजगार” तरुणांची आव्हाढव्य फौज आणी तिची करणे ही भारतातील बेरोजगारीच्या अनेक पैलूंपैकी एक आहे. सामान्यतः शहरी भागात आढळणारी, सुशिक्षित बेरोजगारी ही एक विरोधाभासी परिस्थिती दर्शवते जिथे शिक्षणाचे रोजगारात रूपांतर होत नाही. औपचारिक शिक्षण असलेल्या व्यक्ती, जसे की पदवी किंवा प्रमाणपत्रे, त्यांच्या पात्रतेनुसार योग्य रोजगार शोधण्यात निष्फळ आहेत. ही समस्या शहरी भागात विशिष्ट वयोगटांमध्ये, विशेषत: पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांमध्ये स्पष्टपणे दिसून येते. तरुण आणि सुशिक्षित व्यक्तींचा सर्वात मोठा ज्ञानाचा दुवा असूनही,भारताला विरोधाभासाचा सामना करावा लागतो जेथे औपचारिक शिक्षणाचे रोजगारात रूपांतर होत . इतर विभागात चांगल्या प्रमाणात नोकरीची अथवा रोजगाराची शास्वती असते मात्र ग्रामीण विद्यार्थ्यांचा बाबतीत यात त्रुटी आढळून येतात, मुळात पूर्वापार नसलेल शिक्षित कुटुंब,सभोवतलाच वातावरण,आणी योग्य वेळेत न मिळेलेले मार्गदर्शन यामुळे सहसा एकाधिक क्षेत्रातच उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय तरुण घेतात ! चिंतनाचा विषय म्हणजे निरक्षर आणी अशिक्षित व्यक्तींपेक्षा सुशिक्षित लोकांमध्ये बेजोरगरीचे प्रमाण अधिक आहे हे सत्य पाहून आपण किती भयानकतेच्या दारात उभे आहोत याची प्रचितो येते.प्रमुख कारणांमध्ये शैक्षणिक पात्रता आणि उद्योगाच्या गरजा वाढत्या वयासोबत येणाऱ्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या यांच्यात जुळत नाही.. कंत्राटी कार्य पद्धतीची ही संकल्पनाच मुळात स्थिर रोजगाराची अथवा नोकरीची हमी देत नाही ! त्यामुळे शिक्षण आणि उपलब्ध रोजगार यांच्यात असलेली ही खूप मोठी विसंगती आहे. प्रत्येक पालकांची तथा विद्यार्थ्यांची मानसीक विचार शैली प्रबळ आहे ती म्हणजे जेथे शिक्षण, सामान्यत: चांगल्या करिअरच्या संभाव्यतेसाठी एक मार्ग मानले जाते मात्र बऱ्याच अंशी ते शिक्षण आवश्यकपणे रोजगाराकडे नेत नाही. या परिस्थितीचा परिणाम बर्‍याचदा बेरोजगारीमध्ये होतो, जिथे व्यक्ती त्यांच्या पात्रतेच्या पातळीपेक्षा कमी असलेल्या नोकऱ्या स्वीकारायला भाग पडतात किंवा बेरोजगारी ! तरुण पिढीला नवनवीन गोष्टी नवनवीन तंत्रज्ञान शिकण्यासाठी प्रचंड रस आहे मात्र ते त्यांना फक्त नोकरी आणि भरघोस पगाराचे पॅकेज घेण्यापूर्त मर्यादित राहिलंय. विज्ञान आणि तंत्रज्ञानाची झपाट्याने वाढ आणि त्यानंतरच्या औद्योगिकीकरणामुळे आपल्या जुन्या नैतिक आणि मूल्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे. वय,शिक्षण,जबाबदारी आणी शिक्षणाच्या ओझ्याखाली आ वासून उभी असलेली बेरोजगारी हे केवळ एक ज्वलंत सत्य नसून कित्येक तरुण पिढीचा असंतोष आणि विद्रोह या शिक्षण व्यवस्थेच्या मूल्यांच्या ढासळत्या व्यवस्थेचे फलित आहे.सामान्य वर्गातून विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे; अनेक शिक्षण संस्थेत नोकरी साठी भरमसाठ रकमेची मागणी होत असताना दुसरी कडे हेच विद्यार्थी स्वतःसाठी जीवनाच्या किमान गरजा पुरवू शकत नाहीत.टेबलाखालच्या वाढत्या बक्षिसांमुळे ग्रामीण भागातील उच्च – शिक्षित तरुणांपुढे हे नव्याने उभे राहिलेली आर्थिक संकटे वाढली आहेत.. शैक्षणिक संकुलातील वाढता राजकीय प्रभाव ही देखील एक वाईट गोष्ट आहे आणि उच्च शिक्षणाची कदाचित न मिटणारी समस्या आहे. प्रशासकीय मंडळांना त्यांच्या कारभारात कोणताही राजकीय प्रभाव किंवा हस्तक्षेप नको असतो . मात्र प्रबळ राजकीय नेते, आता विविध विद्यापीठांच्या प्रशासकीय संस्थांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, कारण त्यांच्याकडे बहुतेक संस्था आहेत, शिक्षण (अनुदानित-विनाअनुदानित). त्यांनी स्वत:चे युवा सेल स्थापन करून राजकीय आधारावर विद्यार्थी संघटनांना प्रोत्साहन दिले आहे. ते त्यांच्या राजकीय हेतूंसाठी विद्यार्थ्यांच्या आणी सोबतच शिक्षकांच्या ऊर्जेचा देखिल वापर करतात. विद्यार्थी स्वतःची उद्दिष्टे प्राप्त करण्याची,शिक्षक प्राध्यापक त्यांच्या पगारीची आणी राजकीय मंडळी त्यांच्या राजकीय भविष्याची सांगड घालताना दिसतात. यात प्रामुख्याने भरडला जातो तो सर्वसामान्य घरातला उच्च शिक्षित तरुण,आयुष्यातले महत्वाचे दिवस शिक्षणासाठी खर्च करून सुद्धा त्याच्या आयुष्यात शेवटी बेरोजगारीच्या भीषण आयुष्याचा नवा अध्याय सुरु होतो !

 

– परमेश्वर घुंगासे

9623115496

जालना

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या