20.4 C
New York
Friday, June 14, 2024

Buy now

धरणे आंदोलन नगरपरिषद बीडच्या अनागोंदी कारभार विरोधात यशस्वी- अनिल तुरूकमारे

धरणे आंदोलन नगर परिषद बीडच्या अनागोंदी कारभार विरोधात यशस्वी – अनिल तुरुकमारे

 

पीआरपी चे जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे, न प सिओ वर कारवाईची मागणी

 

बीड प्रतिनिधी – पीपल्स रिपब्लिकन पार्टी यांचे महिलांच्या प्रश्नावर व नपच्या अलागोंदी कारभाराविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन यशस्वी, बीड शहर सुंदर व स्वच्छ शहर होण्या एैवजी दुर्गंधी शहर झालेले आहे. शहरातील घाण गटारी साफ करणाऱ्या महिलांना तीन महिन्यांपासून नगर परिषद् बीड ने कामावरुन काढुन टाकलेले आहे. त्यामुळे शहरात घाणीचे साम्राज्य वाढले असून गटारी सर्वत्र तुंबल्या आहेत. कचरा सर्वत्र साठला आहे. तसेच सदरील कामगारांवर व त्यांच्या कुटुंबीयावर देखील उपासमारीची वेळ आलेली आहे. त्या सर्व बीड येथील नगरपालिकेतील कंत्राटी कामगार महिला या धरणे आंदोलनात होत्या.

 

नगर परिषदेच्या मुख्यधिकारी अंधारे मॅडम यांच्या कार्यकाळातील दलित वस्ती सुधार योजनेची कामे यांच्या काळात इतरत्र करण्यात आली आहे. याच्यासहित सर्व कामाची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र चौकशी समिती स्थापनकरण्यात यावी.

जिल्हाधिकारी बीड यांना दि.01.09.2023 रोजी निवेदन दिले होते. परंतु जिल्हाधिकारी बीड यांनी सदरचे निवेदनास केराची टोपली दाखविलेली आहे, तसेच वारंवार जिल्हाधिकारी बीड यांना लेखी कळवुन देखील कोणतेही काम करण्यास समर्थ असल्याचे दिसत नाहीत. तसेच बीड़ शहरातील रहिवाशी यांना पिण्याचे पाणी 15 ते 20 दिवसाला नगरपरिषद सोडत असून पाण्याविना हाल होत आहेत.

 

जिल्हाधिकारी बीड यांना आम्ही नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अंधारे मॅडम यांना वरील काम लवकरात लवकर करण्या विषयी लेखी निवेदनाद्वारे सांगीतले असतांना देखील आज पर्यंत जिल्हाधिकारी बीड यांनी दुर्लक्ष केले व तसेच जिल्हाधिकारी बीड या अंधारे मॅडम यांना पाठीशी घालत आहेत असे स्पष्ट दिसुन येत आहे. तसेच बीड नगर परिषदेला निधी नसल्यामुळे सदरचे कामगार महिलांना कामावर काढुन टाकण्यात आलेले आहे असे अंधारे सी.ओ.मॅडम यांचे म्हणणे आहे.

 

तरी मुख्यमंत्री यांना विनंती की, बीड शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी महिला कामगारांना तात्काळ कामावर घेण्यात यावे असे संबंधीतांना आदेश करावेत नसता दि. 12.09.2023 रोजी आम्ही बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष अनिल तुरुकमारे यांच्यासह कंत्राटी काम करणाऱ्या महिला मोठ्या सहभागी झाल्या होत्या.धरणे आंदोलना प्रसंगी मोठ्या प्रमाणात शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या