27.3 C
New York
Sunday, June 23, 2024

Buy now

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दुष्काळी मोर्चा मोठ्या संख्येने उपस्थित रहा- अशोक हिंगे

वंचित बहुजन आघाडी च्या दुष्काळी मोर्च्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हा – अशोक हिंगे

 

बीड( प्रतिनिधी ) वंचित बहुजन आघाडी च्या वतीने औरगांबाद येथे होत असलेल्या मंत्रीमंडळ बैठकीवर आदरणीय ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तर प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकुर यांच्या प्रमुख उपस्थितीत धडक दुष्काळी मोर्चा दि.16 संप्टेबरला आयोजित केल्याची माहिती मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांनी दिली आहे.

यावर्षी सुरवातीपासून च मराठवाड्यात पावसाचे प्रमाण अल्प आहेत सुरवातीचा पाऊसही जुनच्या शेवटी पडला. पेरण्याही उशीरा झाल्या त्यानंतर चाळीस दिवसांनी पुन्हा थोडा पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीपाची मुग उडीद कापुस बाजरी ही पिके शंभर टक्के गेली आहेत. अनेक ठिकाणी जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पिण्याच्या पाण्याची ही अनेक गावांत टंचाई निर्माण झाली आहे. काही जिल्ह्यात पिक विमा कंपनीने अग्रमी पीकविमा मंजुर केला आहे. मराठवाड्यातील शेतकरी कर्जबाजारी पणामुळे आत्महत्या करत आहेत. सत्तेतील पक्ष याकडे दुर्लक्ष करून पक्षांतर फुटी च्या समर्थनार्थ सभा घेत फिरत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला कुणाला वेळ नाही. शेतकरी वर्गाला राजकीय नेत्यांनी वार्यावर सोडले आहे.

यासाठी संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत शासनाने जाहीर करून शेतकरी शेतमजुर यांच्या हाताला काम द्यावे.गुरांसाठी गाव तिथे चारा डेपो सुरू करावेत. पाणी टंचाई दुर करण्यासाठी टॅंकर सुरू करावेत या मागणीसाठी वंचितच्या वतीने मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. तेंव्हा या मोर्चात शेतकरी शेतमजुर कार्यकर्ते यांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या