28.9 C
New York
Friday, June 14, 2024

Buy now

आमदार संदीप क्षीरसागरांना धक्का: जिल्हा सरचिटणीस अशोक वाघमारे यांनी सोडली डॉ योगेश क्षीरसागर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत ताकत देणार – अशोक वाघमारे

आ.संदीप क्षीरसागरांना धक्का ; जिल्हा सरचिटणीस अशोक वाघमारे यांनी सोडली साथ

 

डॉ.योगेश क्षीरसागरांच्या नेतृत्वात केला जाहीर प्रवेश

 

बीड दि.१३ (प्रतिनिधी) बीड मतदार संघातील अनेक सहकाऱ्यांनी आ.संदीप क्षीरसागर यांची साथ सोडून उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केले. त्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि कट्टर समर्थक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस अशोक भाऊ वाघमारे यांनी साथ सोडत डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांना साथ देणार आहेत.

 

मागील काही दिवसांपासून बीड मतदार संघाचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांना अनेक सहकाऱ्यांनी विकासकामांच्या मुद्द्यावरून साथ सोडली आहे. आ.संदीप क्षीरसागर हे कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून स्वतः चे घर भरण्याचे काम करत असल्याचे कार्यकर्ते उघडपणे बोलत होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत ज्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव केला होता आता तेच सहकारी त्यांची साथ सोडताना पहावयास मिळत आहे. आज अशेच एक निष्ठावंत, विश्वासू सहकारी असलेले अशोक भाऊ वाघमारे यांनी आ.संदीप क्षीरसागर यांची साथ सोडून काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. अशोक भाऊ वाघमारे हे आ.संदीप क्षीरसागर यांचे वडील रवींद्र क्षीरसागर यांचे पहिल्यापासून एकनिष्ठ आणि विश्वासू कार्यकर्ते राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांनी आ.संदीप यांची साथ सोडली नव्हती. मात्र त्यांनी आ.संदीप क्षीरसागर यांच्याकडून कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले जात असल्याची भावना व्यक्त केली. त्यामुळे कार्यकर्ते त्यांच्या सोबत काम करण्यास नकार देत आहेत. अशोक वाघमारे हे तरुण काळापासून दलित चळवळीत काम करणारे कार्यकर्ते आहेत. त्यांना ग्रामीण आणि शहरी भागात मानणारा मोठा तरुण वर्ग आहे. त्यांचे सर्व समाजाच्या आणि विविध पक्षाच्या नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी चांगले संबंध आहेत. आज त्यांनी डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेतलेला प्रवेश अगदी योग्य असल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या