डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मराठा आरक्षण
एकदा बाबासाहेब घरी संविधान कलमांचा कच्चा आराखडा लिहत बसले होते तर तेथे बॅ. पंजाबराव देशमुख हे कुणबी मराठा समाजाचे नेते आले.
एकदा बाबासाहेब घरी संविधान कलमांचा कच्चा आराखडा लिहत बसले होते तर तेथे बँ. पंजाबराव देशमुख हे कुणबी मराठा समाजाचे नेते आले. बाबासाहेब त्यांना म्हणाले, दादा मी थोडा बाहेर फेरफटका मारून येतो, तोपर्यंत तुम्ही हे संविधान कलमे वाचा व सुधारणा सुचवा, मग बाबासाहेब थोड्यावेळाने येतात तर पंजाबराव देशमुखांच्या डोळ्यात पाणी भरून आलेले दिसले. तेव्हा बाबासाहेब विचारतात दादा का रडताय? तर देशमुख उत्तर देतात, भिमराव, मी इथे ज्या मराठा कुणबी समाजाला आरक्षणाची तरतूद तुम्ही संविधानात करा असे सांगायला आलो होतो ते तर तुम्ही सगळ्यांच्या अगोदर लिहून ठेवलंय.
बाबासाहेब यांनी संविधानाचा मसुदा तयार करून संवीधान सभेत मांडला. प्रत्येक कलमावर चर्चा होत होती नंतर आरक्षणावर चर्चा चालू झाली SC, ST चे आरक्षण मिळवण्यासाठी बाबासाहेब याना जास्त विरोध सहन करावा लागला नाही. पण जेव्हा OBC साठी आरक्षण द्यायची वेळ आली तेव्हा बाबासाहेबांना भरपूर विरोधाचा सामना करावा लागला, पण बाबासाहेबांनी OBC चे हक्क त्यांना मिळवून दिलेच.
बाबासाहेब यांनी मराठा समाजाला पण आरक्षण देण्याची तरतूद केली आणि मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आराखडा तयार केला, पण मराठ्यांचे आरक्षणाबाबत त्या वेळचे विचार काय होते ते कळले तर आज आश्चर्य वाटेल. कारण त्यावेळेस हाच मराठा समाज भलामोठा मोर्चा घेऊन बाबासाहेब यांचा घरी गेला. आणि बाबासाहेबांना त्यांचे म्होरके म्हणाले, आम्ही ९६ कुळी… आम्ही राजे… आम्ही गावचे पाटील…. आम्ही भिकारडे वाटलो का? आम्हाला आरक्षणाची गरज नाही.
बाबासाहेबांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की, तुम्ही आज गर्भश्रीमंत असलात तरी उद्या असणारच असे नाही. आज एका व्यक्तीकडे १०० एकर जमीन असली तरी ते उद्याचा काळात राहणार नाही. उद्या तुमच्या मुलाबाळात ती विभाजित होणार…. नतंर त्यांच्या मुलात… नंतर त्यांच्या पुढच्या पिढीत, असं करता करता ती एकदिवस नाहीशी होणार, म्हणून मराठा समाजाला आज जरी आरक्षणाची गरज नसली तरी ती उद्या गरज पडणार, आणि ते मिळवून देण्यासाठी मी नसणार. तरीही त्या मराठ्यांनी बाबासाहेबांचे ऐकले नाही, म्हणून ती तरतूद वगळून कुणबी मराठा म्हणजेच OBC ची तरतूद केली. आज मराठा समाज जेव्हा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरतो तेव्हा मला बाबासाहेबांच्या त्या शब्दांची आठवण होते. प्रश्न असा निर्माण होतो की, आजतरी मराठा समाज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समजून घेईल का?
संकलन
एस.ए.सोनवणे
वंचित बहुजन आघाडी बीड