25.6 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

spot_img
spot_img

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या गजानन बॅकेला उत्कृष्ट बॅक पुरस्कार.

माजीमंत्री जयदत्त क्षीरसागरांच्या गजानन बँकेला “उत्कृष्ट बँक पुरस्कार ”

 

बीड दि.१२(प्रतिनिधी ):- येथील श्री गजानन नागरी सहकारी बँक लि.,बीड. या बँकेस सन २०२१-२०२२ या वर्षाचा कै.पद्मभूषण वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी बँक पुरस्कार प्राप्त झाला आहे. दि महाराष्ट्र राज्य सरकारी बॅंक्स असोसिएशन लिमिटेड, मुंबई यांच्या तर्फे दिला जाणारा कै.पद्मभूषण वसंतदादा पाटील “उत्कृष्ट नागरी बँक पुरस्कार” छत्रपती संभाजीनगर विभागातून रुपये १०० कोटी पर्यंत ठेवी असणाऱ्या बँका मधून पुरस्कार श्री गजानन नागरी सहकारी बँकेस दि.०९/०९/२०२३ रोजी नाशिक येथे माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू भारत सरकार तथा चेअरमन न्यू ड्राफ्ट पॉलिसी (कॉ-ऑपरेटीव), सहकार मंत्रालय, भारत सरकार नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त कवडे, असोसिएशन चे चेअरमन विश्वास ठाकूर यांचे हस्ते संपन्न झाले. यावेळी सहकार भारतीचे अध्यक्ष डॉ.श्रीमती शशीताई अहिरे, महाराष्ट्र अर्बन सहकारी बॅंक्स फेडेरेशनचे अध्यक्ष अजय ब्रम्हेचा यांच्या हस्ते अवॉर्ड स्वीकारताना बँकेचे संचालक अरुण डाके,बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर एम.आर. व बँकेचे सरव्यवस्थापक डॉ.शेख एम.एस. उपस्थित होते.बँकेचे भाग भांडवल ४ कोटी १६ लाख, राखीव व इतर फंड १५ कोटी ८७ लाख,ठेवी ८९ कोटी ४५ लाख,कर्जे ६० कोटी ४० लाख,गुंतवणूक ३७ कोटी ५० लाख,ढोबळ नफा २ कोटी २४ लाख,नेट नफा १ कोटी, ग्रॉस नॉन परफॉर्मिंग असेट्स २.३७%, नेट नॉनपरफॉर्मिंग असेट्स ०.००%, भांडवल प्राप्त रेशो ३३.२८% आणि एकूण व्यवसाय १४९ कोटी ८५ लाख आहे,बँकेच्या एकूण सात शाखा असून तीन शाखा लवकरच ग्राहकाच्या सेवेत सुरु होणार आहे,ए.टि.एम., मोबाईल बँकिंग, IMPS, UPI इत्यादी सेवा देऊन बँक डिजिटल क्षेत्रात गरुड झेप घेत आहे. बँकेला सतत “ए ” ग्रेड मिळत आहे तसेच बँक रिझर्व बँकेचे सर्व नॉर्म्स पूर्ण करीत आहे. बँकेला आता पर्यंत अकरा ‘उत्कृष्ट बँक अवॉर्ड’ मिळाले आहे .

तसेच बँकेचे सरव्यवस्थापक डॉ.शेख एम.एस. यांना एक “पीएचडी ” संदर्भात व दुसरे ‘उत्कृष्ट मॅनेजर चे अवॉर्ड’ असे दोन अवॉर्ड मिळाले आहे. ही बँकेची फार मोठी उपलब्धी आहे. बँकेचे अध्यक्ष माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे मार्गदर्शन, उपाध्यक्ष जगदीश काळे यांचे योग्य नियोजन तसेच संचालक मंडळाची व कर्मचाऱ्यांची साथ यामुळे बँकेची आर्थिक स्थिती गतवर्षीपेक्षा अधिक मजबूत झाली आहे.

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर एम.आर. व सरव्यवस्थापक डॉ.शेख एम.एस. यांचे योग्य प्रशासन व नियोजन तसेच व्यवस्थापक व्ही.एल. कुंबेफळकर, सहाय्यक व्यवस्थापक लांडे के.ए. व सर्व कर्मचारी वर्ग, सभासद खातेदार, ठेवीदार या सर्वांमुळेच बँकेस अवॉर्ड मिळत आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या