प्रतिनिधी परळी वैजनाथ – मी एक आई बाप मोठी बहिण, भाऊ आहे मी देणारी आहे घेणारी नाही. मी प्रितमताईला देण्याच्या भूमिकेत आहे तिला डावलून मी राजकारणात काम करणार नाही.महाराष्ट्रानं पक्षानं जगानं समजून घ्यावं. डॉ प्रितमताई मुंढेना उचलून मी स्वतः ला बसवणार नाही अशा भावना व्यक्त करत भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र राज्याच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांनी सध्या सुरू असलेल्या उलटसुलट चर्चाना विराम दिला.4 सप्टेंबर पासून शिवशक्ती परिक्रमा यात्रा चांगला प्रतिसाद मिळाला तर आज परळीत शिवशक्ती परिक्रमा यात्रेचा समारोप आज झाला, यावेळी परळी वैजनाथ मतदार संघातील उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांसमोर त्या बोलत होत्या. पंकजाताई म्हणाल्या, 2019 मध्ये जेवढी माझी शक्ती होती, तेवढी 20 24 मध्ये असेल की नाही सांगता येत नाही. पण प्रार्थना करते की मी जशी शुन्य झाले आणि नंतर स्वताला घडवलं तसेच डॉ प्रितमताई ने स्वताला निर्माण करावं.माझा आशिर्वाद प्रितम ताईच्या पाठिशी आहे. तर शिवशक्ती परिक्रमा यात्रा हि शक्ती प्रदर्शन नाही तर शक्तीच आहे असही पंकजाताई मुंडे पण परिक्रमा यात्रेचा महाराष्ट्र राज्य मध्ये प्रचंड जल्लोषात स्वागत करत मिरवणूक काढण्यात आले राज्याच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाची भूमिका या यात्रेत पहायला मिळाली.पकजाताई मुंडे यांनी राजकीय उदान येत आहे भाजपाचे नेते मंडळींना पण येणारे काळात पंकजाताई मुंडे यांच्या समोर झुकावे लागणार हे मात्र निश्चित आहे. र्स्ल