भर पावसात शिक्षक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचं लाक्षणिक उपोषण
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी बुद्धिजीवी शिक्षक प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पाठिंबा
बीड: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरंगे पाटील हे गेल्या चौदा दिवसापासून उपोषणासाठी बसले आहेत यासाठी महाराष्ट्रातून अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले मात्र आता बुद्धिजीवी वर्ग म्हणून ओळखल्या जाणारा शिक्षक प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी आता मनोज जरंगे पाटील यांच्या समर्थनात भर पावसात बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषणासाठी बसले आहेत यावेळेस या प्राध्यापक पक शिक्षकांनी सरकारला इशारा दिला आहे आत्तापर्यंत सगळ्यांनी आंदोलन केले मात्र आता शिक्षक प्राध्यापक हे बुद्धिजीवी व्यक्ती मैदानात उतरली आहे जर आता ही आरक्षणाबाबत निर्णय नाही घेतला तर भविष्यातील संकटांना सरकारला सामोरे जावे लागेल असा इशारा या वेळेस आंदोलकांनी दिला आहे. अनेक पक्ष संघटना व ग्रामपंचायतीने दिला जाहीर पाठिंबा.