नगर परिषद बीडच्या अनागोंदी कारभार व कामाची चौकशी करा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे – अनिल तुरुकमारे
बीड प्रतिनिधी – बीड शहर सुंदर व स्वच्छ शहर होण्या एैवजी दुर्गंधी शहर झालेले आहे. शहरातील घाण गटारी साफ करणाऱ्या महिलांना तीन महिन्यांपासून नगर परिषद् बीड ने कामावरुन काढुन टाकलेले आहे. त्यामुळे शहरात घाणीचे साम्राज्य वाढले असून गटारी सर्वत्र तुंबल्या आहेत. कचरा सर्वत्र साठला आहे. तसेच सदरील कामगारांवर व त्यांच्या कुटुंबीयावर देखील उपासमारीची वेळ आलेली आहे. या बाबत जिल्हाधिकारी बीड यांना दि.01.09.2023 रोजी निवेदन दिले होते परंतु जिल्हाधिकारी बीड यांनी सदरचे निवेदनास केराची टोपली दाखविलेली आहे, तसेच वारंवार जिल्हाधिकारी बीड यांना कळवुन देखील कोणतेही काम करण्यास समर्थ असल्याचे दिसत नाहीत तसेच बीड़ रहिवाशी यांना पिण्याचे पाणी 15 ते 20 दिवसाला सोडत असून पाण्याविना हाल होत आहेत.
जिल्हाधिकारी बीड यांना आम्ही नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अंधारे मॅडम यांना वरील काम लवकरात लवकर करण्या विषयी सांगीतले असतांना देखील आज पर्यंत जिल्हाधिकारी बीड व नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अंधारे मॅडम यांनी काम केलेले नाही, तसेच जिल्हाधिकारी बीड या अंधारे मॅडम यांना पाठीशी घालत आहेत असे स्पष्ट दिसुन येत आहे. तसेच बीड नगर परिषदेला निधी नसल्यामुळे सदरचे कामगार महिलांना कामावर काढुन टाकण्यात आलेले आहे असे अंधारे सी.ओ.मॅडम यांचे म्हणणे आहे.
तरी मा. मुख्यमंत्री साहेबांना विनंती की, बीड शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी महिला कामगारांना तात्काळ कामावर घेण्यात यावे असे संबंधीतांना आदेश करावेत नसता दि. 12.09.2023 रोजी आम्ही बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी.