24.8 C
New York
Friday, June 14, 2024

Buy now

मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा.वंचित बहुजन आघाडीचा 16 सप्टेंबर औरंगाबाद येथील मंत्रिमंडळबैठकीवर मोर्चा

मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा वंचित बहुजन आघाडीचा 16 सप्टेंबरला औरंगाबाद येथील मंत्रिमंडळ बैठकीवर मोर्चा

 

मोर्चाचे नेतृत्व अँड बाळासाहेब आंबेडकर करणार

 

 

वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांची माहिती

 

औरंगाबाद – वंचित बहुजन आघाडीच्या वतीने

मराठवाडा स्तरीय बैठक औरंगाबाद येथील सुभेदारी शासकीय विश्रामगृह येथे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व युवा आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य अमित भूईगळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती वंचित बहुजन आघाडीच्या या बैठकीत औरंगाबाद येथे 16 सप्टेंबर रोजी मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक औरंगाबाद येथे 16 सप्टेंबर ला होणार आहे या बैठकीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यासाठी हि बैठक असल्याची माहिती मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांनी दिली

मराठवाडा दुष्काळाने होरपळत असताना शेतकऱ्यांना पीक विमा दिला नाही खरिप पीक हातातून गेले पाऊसच समाधानकारक नसल्याने रब्बी पिक सुध्दा हातात येईल असे चित्र सध्या नाही सध्या मराठवाड्यात सध्या पाणी टंचाईचे सावट आहे अश्या परिस्थितीत राज्य शासन मात्र मूग गिळून गप्प बसले आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मराठवाड्यातील शेतकरी यांना घेऊन अँड बाळासाहेब आंबेडकर यांचा नेतृत्वाखाली मोर्चा काढून या राज्य सरकारला जागे करून मराठवाडा दुष्काळ ग्रस्त जाहीर करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे या मोर्चाला मराठवाड्यातून पदाधिकारी कार्यकर्ते हे शेतकऱ्यांना घेऊन मोर्चात सहभागी होणार आहे यासाठी मराठवाड्यातील सर्व जिल्हा कमिटीना मोर्चाच्या तयारीसाठी तालुका शहर सर्कल निहाय बैठका घेऊन नियोजन करण्याचे आदेश आज या बैठकीत देण्यात आले यावेळी युवा आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य अमित भूईगळ मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील, मराठवाडा महासचिव रमेश गायकवाड, मराठवाडा मुख्य संघटक महेश निनाळे, मराठवाडा सचिव तय्यब जफर, मराठवाडा कार्यक्रम प्रमुख जितेंद्र शिरसाठ, औरंगाबाद पश्चिम शहराध्यक्ष संदीप शिरसाट, औरंगाबाद पश्चिम जिल्हाध्यक्ष योगेश बन, औरंगाबाद पुर्व जिल्हाध्यक्ष प्रभाकर मामा बकले, युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, जालना जिल्हाध्यक्ष डेविड घुमारे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अँड लताताई बामणे, युवा शहराध्यक्ष मध्य संदीप जाधव, औरंगाबाद पश्चिम तालुकाध्यक्ष अंजन साळवे, औरंगाबाद पच्श्रिम जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, जिल्हा महासचिव शाम भाऊ भारसाकळे, जिल्हा महासचिव पंकज बोर्डे, जिल्हा महासचिव संघराज धम्मकिर्ती, रामदास वाघमारे, सतीश सुरडकर, बीडचे बालाजी महिला आघाडीच्या जिल्हा महासचिव सुनयना मगर, बीडचे युवा नेते बालाजी जगतकर, यांच्यासह मराठवाड्यातील सर्व जिल्हाध्यक्ष महासचिव आदी बैठकीला उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या