28.9 C
New York
Friday, June 14, 2024

Buy now

आई वडिलांची सेवा करा सर्व तिर्थ त्यांच्या सेवेत -विदर्भरत्न सजय महाराज पाचपोर

आई वडिलांची सेवा करा सर्व तिर्थ त्यांच्या सेवेत – विदर्भरत्न संजय महाराज पाचपोर

—————–

पांढरवाडी येथे ४६ व्या अखंड हरिनाम सप्ताहात प्रतिपादन

—————–

गेवराई :

आईवडील हे देवाची रुप आहेत. आई वडिलांची सेवा करा सर्व तिर्थ त्यांच्या सेवेत आहेत. जे कार्य स्वाधीन आहे ते कधी सोडू नका जे स्वाधीन नाही त्यांच्या पाठीमागे लागू नका. आपल्या मुलांसाठी आईवडील जसे लहान होतात तसेच संत समाजासाठी लहान होतात. समाजात वावरताना एकमेकांचे दुख वाटून घ्या. सेवेने भाग्य बदलते म्हणून आई वडिलांची सेवा करा सर्व तिर्थ आईवडिलांच्या सेवेत आहेत असे प्रतिपादन विदर्भरत्न संजय महाराज पाचपोर यांनी व्यक्त केले.

गेवराई तालुक्यातील पांढरवाडी येथे स्वानंद सुखनिवासी संत कुलभूषण संत श्री नगदनारायण महाराज यांच्या कृपाशिर्वादाने श्री.ह.भ.प.महंत शिवाजी महाराज (श्रीक्षेत्र नारायणगड) यांच्या शुभाशिर्वादाने व श्री.ह.भ.प.वै.गुरूवर्य गंगाधर महाराज, पौळाचीवाडीकर यांच्या आशिर्वादाने श्री.ह.भ.प.भाऊसाहेब महाराज जोशी, राजपिंपरी यांच्या कुशल मार्गदर्शनासाठी सुरु असलेल्या ४६ व्या अखंड हरिनाम सप्ताहात सहावे पुप्ष गुंफताना ते बोलत होते. यावेळी तीर्थराज महाराज पठाडे, क्षीरसागर महाराज, शिंदे महाराज, पत्रकार शिवाजी मामा ढाकणे, डॉ. भगवान जाधव, एकनाथ महाराज पठाडे सह गावातील महिला व पुरुष भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती

पुढे बोलताना संजय महाराज पाचपोर म्हणाले की, समाजात आदर्श म्हणून जगा समाज प्रबोधनासाठी कीर्तन आहे. म्हणून कीर्तन, भजन हे काळाची गरज आहे.तसेच साधू होणे फार कठीण आहे. त्याग आणि वैराग्याने साधू बनतात.प्रत्येकाने धार्मिक कार्यात योगदान दिले पाहिजे. कुणी आर्थिक सेवा, कुणी कायिक सेवा तर काहींनी श्रमिक सेवा केली पाहिजे. तसेच घर शाबूत ठेवायचे असेल तर सर्मपण महत्वाचे आहे असा मौलिक सल्लाही त्यांनी सहावे पुष्प गुंफताना दिला. यावेळी त्यांना हार्मोनियमवादक उत्तम नाना मोटे, गायनाचार्य तुळशीराम महाराज आतकरे, ज्ञानेश्वर महाराज औटे, इंद्रजीत महाराज येवले यांची साथ लाभली तर वादक म्हणून कृष्णा काळे, सुग्रीव तवरे यांच्यासह पंचक्रोशीतील टाळकरी, वारकरी यांची साथ लाभली.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या