हा जन्म लागावा सार्थकी लोकसेवेसाठी !
आपल्या बीड तालुक्यातील लोकांना आपल्या वैद्यकीय शिक्षणाचा लाभ व्हावा या निर्मळ हेतूने स्व.केशरकाकू यांच्या आशीर्वादाने के.एस.के.हॉस्पिटलच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे आमची रुग्णसेवा सुरू आहे.पुणे-मुंबई अशा मोठ्या शहरात न जाता रुग्णांना उत्तम सुविधा बीडमध्येच मिळाव्यात हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.
बीड तालुक्यातील नेकनूर येथील 47 वर्षीय रुग्ण प्रचंड पोटदुखीमुळे आपल्या के.एस. के.रुग्णालयात दाखल झाला होता.सोनोग्राफी केल्यावर एक मोठा मुतखडा असल्याचे लक्षात आले.तातडीने शस्त्रक्रिया करून सुखरूपपणे हा मुतखडा बाहेर काढण्यात यश आले.तब्बल पाऊण किलो इतके वजन या मुतखडयाचे भरले आहे.सर्व कौशल्य पणाला लावत यशस्वीपणे ही शस्त्रक्रिया पार पडली.या रुग्णाची तब्येत आता उत्तम असून त्याच्यावर पुढील उपचार सुरु आहेत.
या कामी डॉ.अनिल पवार, भूलतज्ञ डॉ.सचिन चव्हाण आणि हॉस्पिटलचा स्टाफ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
#रुग्णसेवा #operations #patientcare #patients