27.3 C
New York
Sunday, June 23, 2024

Buy now

डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची शिष्यवृत्तीची थकित रक्कम तातडीने द्यावी -विद्यार्थी नेता अभिषेक अडागळे

*भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची चालू शैक्षणिक वर्ष व मागील सर्व वर्षांची थकीत रक्कम (शिष्यवृती) तात्काळ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावी या मागणीसाठी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया बीड जिल्हा कमिटीच्या वतीने आज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय बीड यांना निवेदन देण्यात आले.*

 

*सदरील थकीत सर्व रक्कम विद्यार्थ्यांना देण्यास विलंब केला तर समाज कल्याण कार्यालयासमोर विद्यार्थ्यांना घेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया कमिटीच्या वतीने देण्यात आला.*

 

*यावेळी जिल्हा कमिटी सदस्य अभिषेक अडागळे, विष्णू गवळी, अक्षय वाघमारे, बीड तालुका कमिटी सदस्य आकाश कचरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.*

 

*अभ्यास व संघर्ष जिंदाबाद*!

*#SFI जिंदाबाद*!

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या