29.1 C
New York
Monday, June 17, 2024

Buy now

श्रावण सोमवार: श्रीक्षेत्र गोरक्षनाथ संस्थानवर विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न.श्री कुभेश्र्वराच्या दर्शनासाठी मोठी गर्दी मंदीर परिसर गजबजला

श्रावण सोमवार ; श्रीक्षेत्र गोरक्षनाथ संस्थानवर विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न
————————–
श्री कुंभेश्वराच्या दर्शनासाठी मोठी गर्दी मंदिर परिसर गजबजला
————————–
गेवराई : लोकाशा न्युज
श्रीक्षेत्र गोरक्षनाथ संस्थान, कुंभेजळगाव ता.गेवराई येथे श्रावण सोमवारी प्रतीवर्षी प्रमाणे याही वर्षी संस्थानचे महंत महंत दत्ता महाराज गिरी यांच्या अध्यक्षतेखाली श्री.कुंभेश्वर यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात्रा महोत्सवात पंचक्रोशीतील बंजारा समाजाच्या वतीने सकाळी श्री कुंभेश्वरास गंगोदकाचा जलाभिषेक करण्यात आला तसेच परंपरेप्रमाणे बंजारा समाजाचे भजन यानंतर ह.भ.प.शिवाजी महाराज माने (महांडूळा) यांचे किर्तन संपन्न झाले. दरम्यान यावेळी कुंभेश्वराच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केल्याने मंदिर परिसर गजबजून गेला होता.
यावेळी बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित, माजी सभापती युध्दाजीत पंडित, पंचायत समिती सदस्य तथा गटनेते परमेश्वर खरात, माजी उपनगराध्यक्ष अमोल करांडे, रासपचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर वाघमोडे , भक्तराज पौळ, पत्रकार विनोद पौळ, तुकाराम धस, संतोष पारिख, कैलास महाराज गिरी, हिंमतराव खरात, नंदकुमार पौळ, राम लेंडगुळे, तुकाराम महाराज गिरी, गंगाधर कदम, श्रीधर पौळ, ज्ञानेश्वर पौळ, लेंडगुळे, पांगरे, महादेव बिचकुले, संजय बावचकर सह पंचक्रोशीतील टाळकरी, वारकरी तसेच महिला व पुरुष भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती शेवटी पंचक्रोशीतील बंजारा समाज बांधव व भक्तगण मंडळी यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतील हजारो शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या