*वणीच्या सप्तश्रृंगी गडावर पंकजाताई मुंडे नतमस्तक*
*सप्तश्रृंगी देवी संस्थानच्या वतीने झाला सत्कार ; दिंडोरीच्या स्वामी समर्थ केंद्रातही घेतले दर्शन*
नाशिक । दिनांक ०४।
देवीच्या साडे तीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या वणी येथील सप्तश्रृंगी गडावर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे आज नतमस्तक झाल्या. सप्तश्रृंगी मातेचे दर्शन घेऊन त्यांनी देवीची खण-नारळाने ओटीही भरली.
शिव-शक्ती परिक्रमा अंतर्गत सकाळी श्री घृष्णेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर संध्याकाळी पंकजाताई मुंडे सप्तश्रृंगी गडावर पोहोचल्या. मंदिर संस्थानच्या वतीनं त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. गडावर देवीची ओटी भरून त्यांनी सप्तश्रृंगी मातेचे मनोभावे दर्शन घेतले. शिव आणि शक्तीच्या दर्शनाने परिक्रमेचा आजचा पहिल्या दिवसाचा प्रवास अतिशय उत्साहवर्धक आणि सात्विकतेने सफल झाला अशी आनंदी भावना त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, नाशिककडे जातांना दिंडोरी येथील श्री स्वामी समर्थ केंद्रास भेट घेऊन त्यांनी समर्थांचे दर्शन घेतले.
••••