23.1 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

spot_img
spot_img

दास्य भक्तीचे शिरोमणी हनुमान सर्व साधकांसाठी आदर्श- समाधान महाराज शर्मा

दास्य भक्तीचे शिरोमणी हनुमान सर्व साधकासाठी आदर्श – समाधान महाराज शर्मा

 

नवरात्र उत्सव साजरा करताना घरातील स्त्री शक्तींना सन्मान द्या- समाधान महाराज शर्मा

 

धारुर तालुक्यातील चारदरी गावात तिसरा श्रावण शनिवार उत्सव संपन्न.. हजारों भाविकांची उपस्थिती..

 

पंकजाताईच्या नेतृत्वात तोंडे कुटुंबाने देवस्थानच्या विकासासाठी एक कोटी निधी आणला..

 

बीड – दि -३ (प्रतिनिधी) भक्ती क्षेत्रामध्ये दास्य भक्तीचे शिरोमणी हनुमान सर्व भक्तांसाठी आदर्श आहेत. त्यामुळें पवित्र श्रावण महिन्यात रुद्राभिषेक, शिव भक्ती करा त्याचे दुप्पट फळ मिळते असे प्रतिपादन श्री ह भ प समाधान महाराज शर्मा यांनी केले. धारूर तालुक्यातील चारदरी येथील जागृत हनुमान मंदिरात श्रावण शनिवार निमित्त भारत शिवाजीराव तोंडे व तोंडे परिवाराच्यावतीने आयोजित भव्य उत्सवात ते बोलत होते. यावेळी प्रमुख उपस्थिती श्री ह.भ.प.नाना महाराज कदम, ह.भ.प.बाबा महाराज मुंडे ह.भ.प. विठ्ठल महाराज शास्त्री,भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष मा.रमेश भाऊ पोकळे, माजलगाव विधानसभा भाजपाचे नेते रमेशजी आडसकर साहेब भाजपाचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ अण्णा मुंडे,स्व.झुंबरलालजी खटोड प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.गौतमजी खटोड, शिवाजीराव तोंडे, धारूर बाजार समितीचे सभापती मंगेशजी तोंडे,बन्सी हावळे, यांच्या सह विविध मान्यवर व हजारो भाविक भक्त यांची उपस्थिती होती.

 

धारूर तालुक्यातील चारदरी येथे प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी तिसऱ्या श्रावण शनिवार निमित्त जागृत हनुमान महाराज चारदरी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.समाधान महाराज शर्मा यांचे दुपारी११ ते २ या वेळेत सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले व त्यानंतर महाप्रसाद झाला. यावेळी त्यांनी

 

तुम्ही विश्वनाथ । दीनरंक मी अनाथ ॥१॥

कृपा कराल ते थोडी । पायां पडिलों बराडी ॥ध्रु.॥

काय उणें तुम्हांपाशीं। मी तों अल्प चि संतोषी ॥२॥

तुका म्हणे देवा । कांहीं भातुकें पाठवा ॥३॥

 

या अभंगावर सुंदर चिंतन मांडले. पुढे बोलताना महाराज म्हणाले की दास्यभक्तीमध्ये हनुमान शिरोमणी आहेत. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज काशी विश्वनाथाच्या समोर उभा राहून भातुके पाठवण्याची इच्छा करतात. पवित्र श्रावण महिन्यामध्ये भगवान भोले शंकराचे स्तवन केले असता पुण्य प्राप्त होते त्यासाठी श्रावण महिन्यामध्ये प्रत्येकाने भगवान भोलेनाथाचा अवतार असलेल्या हनुमंताची देखील सेवा केली पाहिजे.. यावेळी संत तुलसीदासजी यांचे चरित्र सांगीतले. प्रत्येक महिलेने स्वतःच्या पतीची सेवा करणे हीच खरी देवाची सेवा आहे.तर नवरात्र उत्सव साजरा करताना घरामधील स्त्रीशक्तीचे देखील पूजन केले पाहिजे, महिलांना मान सन्मान आणि आदर दिला पाहिजे.असं समाधान महाराज यांनी सांगितलं. तसेच आजच्या आधुनिक युगात आपला धर्म , सनातन संस्कार आणि सण उत्सव याच संवर्धन केला पाहिजे.असेही महाराजांनी सांगितलं.

 

या कीर्तनासाठी महाराष्ट्रातील नामांकित गायक वादक व चारदरी परिसरातील सर्व टाळकरी मंडळी यांची उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारत शिवाजी तोंडे व तोंडे परिवाराच्या वतीने मोठे श्रम घेण्यात आले. या कार्यक्रमास मित्रमंडळी नातेवाईक व भाविक मंडळींची हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती.

 

 

चौकट – १) चारदरी येथील जागृत हनुमान मंदिरात भाजप नेत्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे व खासदार प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजप किसान सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश भाऊ पोकळे यांच्या सहकार्याने भारत तोंडे यांनी पर्यटन विकास योजनेअंतर्गत एक कोटी रुपयाची विविध विकास कामे मंजूर केले आहेत. त्यामुळे देवस्थानचा चेहरा मोहरा बदलणार आहे..

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या