28.9 C
New York
Friday, June 14, 2024

Buy now

बीड हेड पोस्ट आॅफीसचे अमरसिंग ढाका यांची महाराष्ट्र पोस्टरल क्रिकेट संघात फेर निवड.

बीड हेड पोस्ट ऑफिसचे अमरसिंग ढाका यांची महाराष्ट्र पोस्टल क्रिकेट संघात फेर

निवड…

 

तर कर्णधार पदी महाराष्ट्र रणजी पटू निखिल धुमाळ यांची निवड सर्व स्तरातून स्वागत व अभिनंदन

 

बीड प्रतिनिधी – येत्या डिसेंबर महिन्यामध्ये राजस्थान येथील जयपूर शहरात होऊ घातलेल्या 34 व्या अखिल भारतीय डाक कर्मचारी क्रिकेट टूर्नामेंट साठी दिनांक एक ते दोन सप्टेंबर रोजी महाराष्ट्र पोस्टल क्रिकेट संघाची निवड डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येते घेण्यात आली. महाराष्ट्र भरातून 200 खेळाडूंनी या निवड चाचणीत भाग घेतला होता. अमरसिंग ढाका यांची या अगोदर 26 वेळा महाराष्ट्र पोस्टल क्रिकेट संघात निवड झालेली आहे. व त्यांनी महाराष्ट्राचे कर्णधार पद ही भूषविलेले आहे. रणजीपटू व चेन्नई सुपर किंग्स चा नेट गोलंदाज निकीत धुमाळ हा खेळाडू याच वर्षी पोस्टात नोकरीला लागला व प्रथमच निवड चाचणीला सामोरा गेला व त्याची कर्णधार पदी निवड करण्यात आली. या संघात अंबाजोगाई पोस्ट ऑफिस चे तेजतर्रार गोलंदाज आयुष्यमान पवन खरात यांची पहिल्यांदाच निवड करण्यात आली. बीड डाक विभागाचे अधिक्षक डाकघर दीपक कुमार शिवनीकर, पोस्ट मास्तर हेमंत पानखडे , डेप्युटी पोस्ट मास्तर विष्णू वीरव सर्व डाक कर्मचारी व बीड शहरातील सर्वच क्रीडाप्रेमींनी अभिनंदन केले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या