*पंकजाताई मुंडे यांच्या ‘शिव-शक्ती’ परिक्रमेची आज श्री घृष्णेश्वरच्या दर्शनाने होणार सुरूवात*
*स्वागतासाठी कार्यकर्त्यांची जय्यत तयारी ; परिक्रमा १२ जिल्हयात जाणार – टिझर झाला प्रचंड व्हायरल*
परळी वैजनाथ ।दिनांक ०३।
शिव आणि शक्तीचे दर्शन घेण्यासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांची परिक्रमा उद्यापासून (ता. ४) बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री घृष्णेश्वराच्या दर्शनाने सुरू होत आहे. राज्यातील जवळपास बारा जिल्हे आणि चार हजार किमीचा प्रवास परिक्रमेचा असणार आहे. या परिक्रमेचा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असून गांवोगावी त्यांच्या जंगी स्वागताची तयारी होत आहे.
उद्या सोमवारी सकाळी ८ वा. पंकजाताई मुंडे छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन शिवशक्ती परिक्रमा सुरू करणार आहेत. तत्पूर्वी सकाळी ७ वा. छत्रपती संभाजीनगर शहरातील पांडूरंग काॅलनी गारखेडा परिसरात संत भगवान बाबा मंदिरात जाऊन त्या दर्शन घेतील. दरम्यान परिक्रमेचा टिझर आज प्रचंड व्हायरल झाला. पराक्रम खूप केले, आता परिक्रमा करू असं सांगत पंकजाताई मुंडे यांनी शिव आणि शक्तीचं दर्शन घेण्यासाठी आपणही सहभागी व्हा असं आवाहन केलं आहे.
*शिव-शक्ती परिक्रमेचा प्रवास*
———-
*४ सप्टेंबर* – सकाळी ८ वा.
घृष्णेश्वर (छत्रपती संभाजीनगर), दुपारी ३.३० वा. सप्तश्रृंगी गड वणी (जि. नाशिक), सायं ६ वा. दिंडोरी येथे स्वामी समर्थ केंद्रास भेट,
*५ सप्टेंबर* सकाळी ७.३० वा.
त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक), दुपारी ४ वा. भीमाशंकर (जि. पुणे), *६ सप्टेंबर* सकाळी १०.१५ वा.
जेजुरी, दुपारी १२.१५ वा.शिखर शिंगणापूर दर्शन (जि. सातारा ), रात्रौ ८.३० वा. कोल्हापूर (जि. कोल्हापूर) येथे अंबामातेचे दर्शन
*७ सप्टेंबर* दुपारी १ वा. पंढरपूर(जि.सोलापूर), संध्याकाळी ६.३० वा. अक्कलकोट *८ सप्टेंबर* सकाळी ११ वा. गाणगापूर दर्शन, सायं ५ वा. तुळजापूर (जि. धाराशीव) भवानी देवीचे दर्शन,
*९ सप्टेंबर* सकाळी ११ वा. करमाळा, दुपारी २.१० वा. पाटोदा (जि. बीड) येथे संत भगवानबाबा जयंती कार्यक्रम, *१० सप्टेंबर*
औंढा नागनाथ (जि. हिंगोली) येथे दर्शन, *११ सप्टेंबर* परळी (जि. बीड) येथे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग दर्शनाने परिक्रमा समाप्त होईल. या प्रवासात पंकजाताई हया अहमदनगर, सांगली, परभणी या जिल्हयातूनही जाणार आहेत.
••••