19 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

spot_img
spot_img

नगर,नाशिक जिल्ह्यात लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या स्वागताला पहिल्याच दिवशी अभूतपूर्व प्रतिसाद

प्रचंड उत्साह अन् अभूतपूर्व…!

नगर, नाशिक जिल्हयात पंकजाताई मुंडे यांच्या स्वागताला पहिल्याच दिवशी तुफान गर्दी

‘कोण आली रे कोण आली’…’मुंडे साहेब अमर रहे’ च्या घोषणांनी परिसर दणाणला

येवल्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेसह सर्व स्तरातून कार्यकर्ते स्वागताला पुढे

नाशिक ।दिनांक ०४।
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांची शिव-शक्ती परिक्रमा श्री घृष्णेश्वराचे दर्शन घेऊन अहमदनगर व नाशिक जिल्ह्य़ात दाखल झाल्यानंतर या दोन्ही जिल्हयात त्यांचं जोरदार स्वागत झालं. कार्यकर्त्यांचा सळसळता उत्साह अन् अभूतपूर्व अशा स्वागताने पहिल्याच दिवशी तुफान गर्दीने जोरदार बॅटींग केली.

भक्ती आणि शक्तीच्या दर्शनासाठी पंकजाताई मुंडे यांची शिव-शक्ती परिक्रमा आजपासून सुरू झाली, ११ सप्टेंबरला परिक्रमेचा समारोप परळी येथे होणार आहे.सकाळी घृष्णेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर ही परिक्रमा सप्तश्रृंगी गडाकडे जाण्यासाठी अहमदनगर व नाशिक जिल्हयात मार्गस्थ झाली. रस्त्यात कोपरगाव, येवला, विंचूर, बोकडदरा, निफाड, शिवरे फाटा, पिंपळगाव बसवंत, जेऊळका आदींसह ठिकठिकाणी पंकजाताई मुंडे यांचं फटाक्यांच्या आतिषबाजीत, जेसीबीतून फुलांची उधळण करत अभूतपूर्व असं जंगी स्वागत करण्यात आलं. कोपरगाव येथे सदगुरू शुक्राचार्य आणि शुक्लेश्वराच्या मंदिरात जाऊन पंकजाताईंनी दर्शन घेतले, याठिकाणी उपस्थित ग्रामस्थांशी तसेच तरूणाईशी त्यांनी संवाद साधला. माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या निवासस्थानी त्यांचं कोल्हे परिवारच्या वतीने सत्कार करण्यात आला. रस्त्यात सर्वच ठिकाणी कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह आणि तुफान गर्दी पहायला मिळाली.

*पंकजाताईंचे सर्व स्तरातून स्वागत ; राष्ट्रवादी, सेनेचे कार्यकर्त्यांनीही केला सत्कार*
————-
येवल्यातील चौकात भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पंकजाताईंनी अभिवादन केलं. दरम्यान या परिक्रमेचं स्वागत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेसह सर्वच पक्षाचे कार्यकर्ते पुढे आल्याचे दिसून आले. कोपरगावला राष्ट्रवादीचे आ. आशुतोष काळे यांनी पंकजाताईंच्या स्वागताचे बॅनर लावले होते. येवल्यात मंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थकांनी जोरदार स्वागत केलं तर दुसरीकडे शिवसेना आ. नरेंद्र दराडे यांनी निवासस्थानी त्यांचा सत्कार केला.
••••

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या