20.5 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

spot_img
spot_img

दान पारमितेतून मानवाला सुख समाधान व शांती मिळते -पु.भिक्खू धम्मशील थेरो

दान पारमितेतून मानवाला सुख समाधान व शांति मिळते – पु.भिक्खू धम्मशील थेरो

धम्मदेशने सोबतच मोफत दंतच चिकित्सा शिबिराचे आयोजन

बीड प्रतिनिधी – जगातील कोणेताही मानव दुःखमुक्त नाही. सर्वत्र अशांतता तसेच असहिष्णुता वाढत आहे. करूणेच्या अभावां पाई एकमेका बद्दल द्वेष, राग, मच्छर , व हिंसक विचार वाढत आहेत. दुर्मिळ अशा मानव जन्मात दुःखमुक्त व्हायचे असेल तर मनात दान पारमिता वाढवून तसेसे आचरण करून सुख, समाधान व शांती प्राप्त करता येते असे प्रतिपादन पूज्य भिक्खू धम्मशील थेरो यांनी केले. धम्मभूमी डॉ.भद्त आनंद कौशल्या नगर धम्महॉल शिवनी येथे प्रियदर्शशी धम्मसंस्कार शिक्षण संस्थे ने आयोजित केलेल्या धम्मदेशनेच्या कार्यक्रमास डॉ. उपगुप्त महाथेरो पूर्णा व डॉ.एस पी गायकवाड तसेच एल.आर. रोडे दादा यांची प्रमुख उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून एस.टी.आगारा प्रमुख (वरिष्ठ )बीड मा.संजय पुंडगे यांची उपस्थिती होती.सत्कारमूर्ती डॉ.अशिष गाडे एम.डी.चेष्ट मेडिसिन उपस्थित होते. संस्थेचा सामाजिक उपक्रम म्हणजे धम्मदेशने बरोबरच डॉ.प्राची सांगवीकर डेंटल सर्जन यांच्या सहाय्याने मोफत दंतवश चिकित्सा शिबिराचे आयोजन केले होते. गरजूंनी लाभ घेतला.

सर्वप्रथम बोधीवृक्षाची पूजा करून धम्महॅल येथे तथागतांच्या प्रतिमेस पूज्य भंतेच्या हस्ते पुष्प तर मान्यवरांच्या हस्ते तथागतांना पुष्प व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पूज्य भंतेजींनी उपस्थितीना त्यांना त्रिसरण पंचशील दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे संचालक जी.एम‌ भोले यांनी करून संस्था करीत असलेल्या उपक्रमाबद्दल तसेच पुढील विस्तारित उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली. पुढे आपल्या देशनेत म्हणाले की पु. मध्ये म्हनालेकी बुद्धाला महाकारूणीक तथागत बुद्ध म्हणतात कारण त्यांच्या ठाई सर्वप्रती प्रेम, करुणा होती, 45 वर्षे पायी प्रवास करून आपल्या अमोल उपदेशातून दुःखमुक्तीचा मार्ग दाखविला. मानव जन्म हा अत्यंत दुर्मिळ आहे. याकरता माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे हे केवळ प्रज्ञा, शिल,करुणा, त्रिशरण पंचशील व आर्य आष्टंगिक मार्ग आणि दहा पामीतेचे पालन करूनच शक्य आहे‌ असे तथागताच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगितले, उपाशीकांनी मंत्रमुग्ध होऊन धम्मदेशनीचा लाभ घेतला. दुसऱ्या प्रती प्रेम, करूणा असेल तर प्रत्येक जण बहुजन हिताय बहुजन, सुखाय या उदात्त्वा तत्वाप्रमाणे वांगेल असे स्पष्ट केले. मानव जातीचा कल्याण करणारा हा विचार संपूर्ण जगाला संदेश देत आहे की करुणेने शांती मिळेल. मानव दुःख मुक्त होईल. जगाला युद्ध नको तर बुद्ध हवा आहे तरच हे जग प्रचंड विनाशकारी शस्त्र सज्जेतेतून वाचू शकेल. दुसऱ्याबद्दलची दुष्टभावना, भय, मद,राग विकारापासून विकारमुक्त मन म्हणजे शुद्ध चित्त होय. खरं सुख धम्मा अचरणातून प्राप्त होते . निर्वाण हे परम सुख कसे आहे हे अत्यंत सोप्या भाषेत उदाहरणे देऊन समजावून सांगितले, केवळ धन मिळवल्याने सुख मिळत नाही. तर त्यांनी चिंता, भय,अहंकार,मनाच्या अशांततेत वाढ होते.योग्य मार्गाने कमावलेल्या धनाला दानाची जोड दिल्यास मन :शांती सुख, मिळते हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. असे अनेक उदाहरणे देऊन समजावून सांगितले कार्यक्रमास शिवणी व बीड परिसरातील उपासक उपासिकांची बालकांची बहुसंख्येने सदस्यांची उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सदस्य डी.जी.वानखेडे यांनी व्यक्त केले‌. शीलाताई राजेश वाघमारे यांनी भोजनदान तर बबीता कल्याणराव गाडे यांनी खीर दान दिले,सरणात्तने कार्यक्रमाची सांगता झाली.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या