28.9 C
New York
Friday, June 14, 2024

Buy now

बीड जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनास वंचितचा पाठिंबा

बीड जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनास वंचितचा पाठिंबा
बीड (प्रतिनिधी) अंतरवली, ता. आंबड जि. जालना येथे मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणाबाबत शांततेच्या मार्गाने चालु आसलेले आंदोलन शुक्रवारी पोलीसांनी बळाचा वापर करत जमलेल्या शिवप्रेमी मावळे व आंदोलनकर्ते यांच्यावर अमानुष लाठीचार्ज करत जबर मारहान केली. आंदोलनाला पोलीस प्रशासनाने हिंसक वळण दिले. त्यामुळे शांततेच्या मार्गाने चाललेल्या आंदोलनाला गालबोट लागले. घडलेल्या घटनेचा वंचित बहुजन आघाडी बीड जिल्ह्याच्या वतीने जाहीर व तिव्र निषेध व्यक्त करत आहोत.
वंचीत बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर व प्रदेशाअध्याक्ष रेखाताई ठाकुर यांच्या आदेशान्वये बीड जिल्ह्यात होणाऱ्या आंदोलनास जाहिर पाठींबा दिला आहे यावेळी वंचितचे जिल्हामहासचिव ज्ञानेश्वर कवठेकर, युवा नेते अजय सरवदे, प्रसिद्धी प्रमुख बालाजी जगतकर, ता.अध्यक्ष किरण वाघमारे, शहराध्यक्ष लखन जोगदंड, मिलिंद सरपते, अमोल उजगरे सह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या