25.6 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

spot_img
spot_img

गेवराई मूकबधिर व मतिमंद विद्यालयात रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न

गेवराईत मूकबधिर व मतिमंद विद्यालयात रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न

——————————-

मिष्टान्न भोजन; दिव्यांग संघर्ष समितीच्या सुनिता भुते यांचा पुढाकार

——————————-

गेवराई :

रेणुकामाता बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित कै.भगवानराव ढोबळे मूकबधिर निवासी विद्यालय व मतिमंद निवासी विद्यालय, गेवराई येथे सामाजिक कार्यकर्त्या दिव्यांग संघर्ष समितीच्या अध्यक्षा सुनिता भुते यांच्या पुढाकाराने मूकबधिर व मतिमंद विद्यार्थ्यांना रक्षाबंधन निमित्त राख्या बांधून दिव्यांग विद्यार्थांना मिष्टान्न भोजन देवून रक्षाबंधन सण उत्साहात साजरा करण्यात आला

हिंदू संस्कृतीनुसार श्रावण महिन्यातील नारळी पोर्णिमेला बहिण भावाच्या अतुट नात्यांचा पवित्र समजला जाणारा रक्षाबंधन हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.बहीण आपल्या भावाला हातात राखी बांधून भावास दिर्घ आयुष्य लाभावे म्हणून प्रार्थना करते. याच उद्देशाने दिव्यांग संघर्ष समितीच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्या सुनिता भुते यांच्या पुढाकाराने बुधवार दि.३० ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सनाचे औचित्य साधून निवासी मुकबधीर व मतिमंद राख्या बांधुन मुकबधीर व मतिमंद विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देवून विद्यार्थ्यांसोबत रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी दिव्यांग संघर्ष समितीच्या अध्यक्षा सुनिता भुते, मनिषा खटावकर, रामेश्वर भुते, उत्कर्षा होंडे, निकिता कादे

यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या