27.3 C
New York
Sunday, June 23, 2024

Buy now

गोरक्षनाथ टेकडीच्या विकासासाठी कायम प्रयत्नशील -माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

गोरक्षनाथ टेकडीच्या विकासासाठी कायम प्रयत्नशील – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

 

 

बीड दि.31(प्रतिनिधी)ः- बीड जिल्ह्यातील ज्या-ज्या तीर्थक्षेत्रांशी आपला संबंध आला आहे त्या त्या तीर्थक्षेत्रात विकास कामे करण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील असतो गोरक्षनाथ टेकडीच्या विकासासाठी आपण कायम प्रयत्नशील राहू असे सांगून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी टेकडीच्या विकासासाठी पर्यटन विकास मधून एक कोटी साठ लाख रुपये मंजूर झाल्याचे सांगितले.

बीड तालुक्यातील श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे विसाव्या शतकातील महान संत ह.भ.प.वै. सद्गुरू किसन बाबा महाराज यांच्या 25 व्या पुण्यतिथीनिमित्त मठाधिपती ह.भ.प. शांतिब्रम्ह गुरुवर्य नवनाथ बाबा महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली रौप्य महोत्सवी-अखंड हरिनाम साप्ताहाची सांगता ह.भ.प. संजय महाराज पाचपोर यांच्या काल्याच्या किर्तनाने संपन्न झाली. यावेळी जिल्हातील सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, आज प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने भाविक उपस्थित आहेत या परिसरातील वैकुंठवासी किसन बाबा आणि शांती ब्रह्म नवनाथ बाबा हे दोघेही याच ठिकाणचे आहेत त्यामुळे त्यांचा गावागावातून मोठा भाविक वर्ग असून आज या ठिकाणी पंढरीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तेराव्या शतकापासून सुरू झालेल्या वारकरी सांप्रदायाची पताका जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचली आहे. तनमन धनाने या ठिकाणी भाविक हजेरी लावतात संतांनी सांगितल्याप्रमाणे धन सत्कार यासाठी आणि मन भक्तीसाठी रमले तर आयुष्य सुखी आणि आनंदी होते, या टेकडीवर जेव्हा तेलाचा दिवा लागत होता तेंव्हापासून आपण या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. लाईट, पाणी आणि या ठिकाणी सभागृहासाठी आपण सातत्याने निधी उपलब्ध करून देत आलो आहोत. या ठिकाणची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यासाठी 25/15 अंतर्गत 25 लाख रुपये उपलब्ध करून देण्याची संधी मिळाली तो निधी उपलब्ध करून दिला. काही महिन्यापूर्वीच या ठिकाणचा विकास प्रस्ताव पर्यटन विकास महामंडळा अंतर्गत दाखल करण्यात आला होता. ही बाब जेव्हा या ठिकाणच्या भाविकांनी सांगितली तेव्हा आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करून हा निधी मंजूर करून घेण्यासाठी पुढाकार घेतला. लवकरच हा निधीही उपलब्ध होणार आहे. जेव्हा-जेव्हा बीड जिल्ह्यातील गडांच्या विकासाचा प्रश्न येतो तेव्हा तेव्हा आपण सातत्याने प्रयत्न करून त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आलो आहोत. गडाच्या विकासासाठी कुठल्याही प्रकारचे राजकारण न करता सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन काम केले तर त्याचा परिणाम खूप मोठा होतो, हे इथे उभारलेल्या भव्य सभागृहकडे बघितल्यावर लक्षात येईल. गोरक्षनाथ टेकडीचा भव्यसभामंडप उभारण्याचा निश्चय केला होता तो पूर्णत्वास गेल्याचे समाधान वाटते आहे, यापुढे जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा आपण या गडाच्या विकासासाठी निश्चितच पुढाकार घेऊ, सध्या सर्वांचे डोळे पाण्याकडे लागले आहेत डोळ्यात पाणी येऊ लागल्याने चित्र निर्माण झाले आहे, निसर्गाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यात सातत्याने दुष्काळ पडू लागला आहे. पिण्याच्या पाण्याची भ्रांत आहे यासाठीच आपण मराठवाड्याचा पाणी प्रश्न सुटावा यासाठी प्रयत्न करत आहोत, त्याला आता चालना मिळू लागली आहे. पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राकडे जाणारे पाणी मराठवाड्यात वळवले तर पुढच्या पिढ्यांना त्याचा फायदा होईल असे सांगून त्यांनी उपस्थित भाविक भक्तांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.

  1. यावेळी ह.भ.प. लक्ष्मण महाराज मेंगडे, नाना महाराज कदम, अखंडानंद गिरी महाराज, मंझरीकर महाराज, जगदीश काळे, अरुण डाके, गंगाधर घुमरे, विलास बडगे, दिनकर कदम, नानासाहेब काकडे, अरुण बोंगाणे, गणपत डोईफोडे,बालाप्रसाद जाजू, तानाजी कदम, सखाराम मस्के, अ‍ॅड. विष्णुपंत काळे, गोरख दन्ने यांच्यासह परिसरातील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या