20.5 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

spot_img
spot_img

वडार समाजाच्या विकासासाठी दीर्घकालीन योजनाची गरज – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

वडार समाजाच्या विकासासाठी दीर्घकालीन योजनांची गरज- माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

 

बीड/प्रतिनिधी

राज्यातील उपेक्षित समाजासाठी सरकारने पाच महामंडळांची स्थापना केली असून या महामंडळाच्या माध्यमातून विकास साधण्याचा प्रयत्न केला असला तरी वडार समाज विकासाच्या प्रक्रियेपासून अजूनही उपेक्षित आहे या समाजाच्या विकासासाठी दीर्घकालीन योजनांची गरज असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले आहे

 

वडार समाज महाराष्ट्र राज्य भटक्या विमुक्त जाती जमाती सामाजिक आधार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या विमुक्त जाती जमाती स्वतंत्र दिवस व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी माजी मंत्री महादेव जानकर, टी एस चव्हाण, रमेश गालफाडे, जगदीश काळे,दिनकर कदम,विलास बडगे, दादासाहेब मुंडे अण्णासाहेब मतकर, भगवान माने, धोंडीबा उपळकर, राजाराम जाधव, यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते

 

यावेळी बोलताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, वडार समाज हा शासनाच्या योजनेपासून वंचितच आहे राज्यातील उपेक्षित समाजासाठी सरकारने पाच वेगवेगळे महामंडळ स्थापन केले आहे यासाठी 50 कोटी रुपयांचा निधी देखील उपलब्ध करून दिला आहे आतापर्यंत भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी भरीव निधी कधीच मिळाला नाही सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी मी मंत्रिमंडळाचा असताना आणि नसतानाही शासन दरबारी प्रयत्न करत असतो अनेक अडचणी येतात काही सुटतात ही पण या समाजाचा विकास होऊन त्यांना विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी दीर्घकालीन योजनांची गरज आहे जो समाज मूर्ती घडवणारा असून हातामध्ये छाननी हातोडा घेऊन आपली उपजीविका भागवत आहे त्या समाजाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रश्न सोडून घ्यायला हवेत,घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना निर्मिती केली त्या घटनेमध्ये छोट्या छोट्या समाजासाठी आरक्षित बाबींचा समावेश केला आहे, प्रत्येक माणसाचा हक्क हा या घटनेमधून दिलेला आहे, हक्काचे घर मिळावे यासाठी या समाजातील कुटुंबांना आपण प्रयत्न करून घरे मिळवून दिली आहेत, आज शेकडो कुटुंब स्वतःच्या घरात राहत आहेत, आजच्या मेळाव्याच्या माध्यमातून या समाजाने ज्या मागण्या केल्या आहेत त्या सोडवण्यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करू अशी ती म्हणाली यावेळी वडार समाज संघटनेतील महिला पुरुष आणि तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या