14.6 C
New York
Monday, November 11, 2024

Buy now

spot_img
spot_img

अजित दादा हे वागणं बरं नव्हं!रयत शेतकरी संघटनेचे नेते सुनील ठोसर यांचा सवाल

अजित दादा हे वागणं बरं नव्हं!

—————————

रयत शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर यांचा सवाल

—————————–

 

दि.२६ गेवराई ( प्रतिनिधी ):- राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव मदत होईल असे अनेक वेळा शासन निर्णय आपण वेगवेगळ्या सरकार मध्ये आपणच घेतले व याची पूर्तता आजतागायत झालेली नाही. अतिवृष्टी अनुदान, पीककर्ज व्याज सवलत, आत्महत्या गृस्थ कुटुंबांना मदत, निराधारांच्या विविध अडचणी, गौण खनिज प्रकरणे, मागील पीकविमा सह शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून अनुदान कधी पडणार यातच आपल्या समवेत असणारी नेते मंडळी व त्यांच्या लागे बांधीत असणारे आले कॉन्ट्रॅक्टर सर्व आपण जनतेची फसगत करत आहात समस्या वगळून आपण सत्तेच्या जोरावर मोठमोठे मेळावा आयोजित करत प्रशासनाची व जनतेची क्रूर चेष्टा करत आहात, पावसाच्या दुर्लक्षाने सर्व पिकांचे अतोनात नुकसान झाले याचे सर्व अहवाल प्रशासनाने आपल्याकडे दिलेले असताना शेतकऱ्यांना मदत देण्याऐवजी आपण दौरे व मेळावा आयोजित करत ही सरकार व जवाबदारी सोडून ही नैतिकता योग्य वाटते का? आम्ही निषेध करतो वेळ पडल्यास मंत्रिमंडळाचा ताफा अडवू सरकारने शेतकरी बांधवांना भरीव मदत जाहीर करावी तसेच स्थानक प्रशासनास तातडीचे आदेश देऊन तत्काळ अहवाल घेऊन तत्काळ मदत होईल असे निर्णय घेतला पाहिजे नसता आम्ही शेतकरी संघटना ठिकठिकाणी जाब विचारण्यासाठी सज्ज आहोत त्यामुळे मी रयत शेतकरी संघटना गेवराई तालुक्यात आपल्या सरकारचा निषेध करतो शेतकरी संघटना सह शेतकऱ्यांना व पदाधिकाऱ्यांना सोबत आपला ताफा अडवू असे सुनील ठोसर यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या