28.9 C
New York
Friday, June 14, 2024

Buy now

चिखली येथे जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप

चिखली येथे जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना स्कुल बॅगचे वाटप

 

सामाजिक बांधिलकी: स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अशोक जाधव यांचा पुढाकार

 

गेवराई:

तालुक्यातील चिखली येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत १५ ऑगस्ट रोजी ७६ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत कार्यालय वडगाव चिखली यांच्या तर्फे शाळेसाठी स्मार्ट एलईडी टिव्ही भेट दिला. तसेच सामाजिक कार्यकर्ते व ग्रा.पं.सदस्य अशोक जाधव यांच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, शैक्षणिक साहित्य तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच चिखली येथील अभिषेक अशोक शिंदे हा इंडियन आर्मीमध्ये भरती झाल्याबद्दल गावकऱ्यांतर्फे सत्कार करण्यात आला. व नवनियुक्त शिक्षक कैलास सपकाळ, लहू पुरी यांचा देखील गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

 

यावेळी सरपंच मच्छिंद्र ढेरे, उपसरपंच बाळू वारे, ग्रामसेवक राजेंद्र बन, ग्रामपंचायत सदस्य साईनाथ सुरवसे, वशिष्ठ काळे, सुलेमान शेख ,सुनील औटे, भाऊसाहेब औटे, बाबासाहेब तुरुकमारे ,बबन काळे, हनुमंत औटे, संदिपान ठोसर ,श्रीमंत जाधव ,आप्पासाहेब शिंदे,रमेश वारे ,राधाकिसन शिंदे ,जालिंदर वारे, रामकिसन वारे,आदिनाथ माळी , प्रमोद तुरुकमारे,भास्कर वारे ,शिवाजी शिंदे, संतोष वारे, बप्पासाहेब जाधव, मनोहर वारे, गहिनीनाथ शिंदे, रामनाथ वारे, सुरेश एकशिंगे, विष्णू ठोसर, दामु वारे, प्रल्हाद ठोसर, अंगद सुपेकर,अतुल वारे, मोईन सय्यद, कृष्णा माळी, केदार कांबळे, अर्जुन गव्हाणे,संदीप गवते, बाबासाहेब वारे, सुनील वारे, कानिफनाथ वारे, सोमा शिंदे, मोबीन सय्यद, योगेश वारे,भरत सुपेकर, रमेश शिंदे, भरत ठोसर, महादेव जाधव, ओम शिंदे, सोमा जरांगे ,अर्जुन वारे, सिद्धेश्वर शिंदे, पांडूरंग ठोसर, रामदास वारे,सुनील एकशिंगे, आबासाहेब तुरुकमारे, भागवत वारे, रवी तुरुकमारे, अशोक वारे, अशोक शिंदे ,अंगद जाधव, संकेत वारे, संजय तुरुकमारे , शालेय पोषण आहार कर्मचारी सौ.जयश्री वारे मॅडम तसेच आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी स्वातंत्र्य दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांची भाषणे झाली. विद्यार्थ्यांना सपकाळ सर, संदिपान ठोसर, जालिंदर वारे यांनी मार्गदर्शन केले व शेवटी पुरी सर यांनी आभार मानले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या