15 ऑगस्ट रोजी नाथ्रा येथे ग्रामसभा घेण्यात यावी – गौतम आदमाने
परळी प्रतिनिधी. 15 ऑगस्ट रोजी राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे नाथ्रा ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामसभा आयोजित करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीचे गौतम आदमाने यांनी एका निवेदनाद्वारे पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात गौतम आदमाने यांनी म्हटले आहे की, दिनांक 19 जून रोजी नाथ्रा गावचे सरपंच व ग्रामसेवक यांना लेखी ग्रामसभा घेण्याबाबत विनंती करण्यात आली.तरी ग्रामसभा घेण्यात आली नाही. येत्या १५ ऑगस्ट रोजी गावात ग्रामसभा घेण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी नोटीस बोर्डावर याबाबत सूचना लावण्यात यावी, तसेच संपूर्ण ग्रामसभेचे 15 ऑगस्ट रोजी व्हिडिओ चित्रीकरण करण्यात यावे. फोटो काढण्यात यावेत.
याबाबत आपण नाथ्रा येथील सरपंच व ग्रामसेवकांना नोटीस काढावी अशी मागणी वंचित बहुजन व आघाडीचे गौतम आदमाने यांनी केले आहे.