10.5 C
New York
Saturday, November 9, 2024

Buy now

spot_img
spot_img

डॉ सुरेश साबळे निलंबित पण अवैध भरती उमेदवार यांच्यावर कारवाई कधी होणार?

 

डॉ सुरेश साबळे निलंबित अवैध भरती उमेदवार यांच्यावर कारवाई कधी होणार?

बीड- ज्या ब्लॅकलिस्ट एजन्सी मार्फत लोखंडी सावरगाव येथील रुग्णालयात भरती केल्यामुळे हे प्रकरण गाजले आणि  डॉ सुरेश साबळे यांच्यासारख्या मग्रूर अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई झाली त्या भरती झालेल्या कर्मचाऱ्यांवर कधी कारवाई होणार अशी चर्चा आरोग्य यंत्रणेत सुरू झाली आहे.

बीड जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे यांनी लोखंडी सावरगाव येथील रुग्णालयात 73 कर्मचाऱ्यांची भरती केली.ही भरती करण्याची प्रक्रिया ज्या एजन्सी मार्फत राबवली गेली ती महाराष्ट्र विकास ग्रुप नाशिक नावाची एजन्सी मध्ये ब्लॅकलिस्ट असून भरती बोगस असल्याचा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानपरिषद मध्ये केला.

या प्रकरणी डॉ सुरेश साबळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. डॉ सुरेश साबळे यांच्यावर कारवाई झाली मात्र ज्या लोकांची भरती झाली त्यांच्यावर अद्याप काहीच कारवाई झालेली नाही.बहुतांश कर्मचाऱ्यांनी नोकरीसाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार केल्याचे आरोप होत आहेत.

ज्या भरती वरून जिल्हा शल्य चिकित्सक दर्जाचा अधिकारी निलंबित होतो त्या भरती प्रक्रियेची चौकशी करून भरती झालेल्या लोकांना बडतर्फ करणे आवश्यक आहे. मात्र याबाबत अद्याप काहीच हालचाल नसल्याचे दिसून येत आहे. डॉ सुरेश साबळे यांच्या निलंबनाची कारवाई झाली असताना आरोग्य विभागात कर्मचारी व दलाल एजंट हे घाबरून जाऊ लागले आहेत अनेक मोठे अधिकारी या मध्ये अडकतील या भितीने परेशाण झाले आहे

 

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या