20.5 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

spot_img
spot_img

अंबाजोगाई पोलिस प्रशासनाच्या आशिर्वादाने अवैध धंदे खुलेआम अनेक भागात आॅनलाईन बिंगो जोमात चालू?

*अंबाजोगाईत पोलिस प्रशासनाच्या आशिर्वादाने अवैद्य धंदे खुलेआम सुरू ?*

 

 

 

*अनेक भागात ऑनलाइन बिंगो जोमात चालू?*

 

अंबाजोगाई (प्रतिनिधी) – : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमध्ये सर्व अवैध धंदे खुलेआम असून स्थानिक पोलीस तर राजकीय भूमिकेनुसार कारवाई करतात अनेक मोठं मोठे घातपात होऊन ही पोलीस मात्र अवैद्य धंदे करणाऱ्यांवर कसलीही कारवाई न करता त्याच्याशी मैत्री करून खुलेआम जनतेसमोर फिरतात त्यामळे जनता सभ्रमात आहे कोण रक्षक कोण भक्षक आहे न्यायाची अपेक्षा कोणाकडून करावी अशी चर्चा अंबाजोगाईत सुरू आहे अनेक वेळा आयपीएस अनेक आले त्यानी येऊन अंबाजोगाईत कारवाया केल्या मात्र स्थानिक पोलीस दखल घेत नव्हते याची जाण माहिती एसपी सुद्धा असताना एसपी साहेब सुद्धा डोळे बंदची भूमिका करत आहेत मग न्याय देणार कोण? कारवाई करणार कोण ? अंबाजोगाई शहरामध्ये गुन्हेगारी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अंबाजोगाई या शहराकडे शिक्षणाचे माहेरघर म्हणून पाहिले जाते. मात्र याच शहरात दुसऱ्या बाजूने डाग लावण्याचे काम ऑनलाईन बिंगो चालविणारे तसेच अवैध धंदे चालविणारे वाढत आहेत. या धंद्याकडे तरुण अडकविले जातात. या बिघडणाऱ्या तरुणाईला जबाबदार कोण ?याचे उत्तर पोलीस प्रशासनाने द्यावे.

असे अनेक प्रश्न निर्माण झाली आहेत. बीडचे पोलिस अधीक्षक यांनी अंबाजोगाई शहराकडे लक्ष देऊन, अंबाजोगाईत खुलेआम गुटखा,मटका ,गल्ली गल्लीत बिंगो सुरू आहेत .अनेक सामान्य जनतेला विध्यार्थी विद्यार्थिनी नौकरदार लोक परेशान असल्याची माहिती मिळेल अंबाजोगाईत अनेक युवक सवयी मुळे आपले जीवन संपवत आहेत अश्या अवैद्य धंदे मुळे एका महिन्यात चार चार खून होत आहेत तरी सुद्धा स्थानिक पोलिस प्रशासन किंवा एसपी यांनी ठोस अशी मोठी करावाई केली नसल्याची माहिती सुद्धा तुम्हाला मिळेल आपण यात वैक्तिक लक्ष देऊन या अवैद्य धंदेना चांगला चोप द्यावा जेणेकरून पुढील काळात अंबाजोगाईमध्ये अवैद्य धंदे करण्याचे धाडस कोनी करू नाही अशी अपेक्षा सर्व अंबाजोगाईकर आपल्याकडून करत आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या