28.9 C
New York
Friday, June 14, 2024

Buy now

डॉ सुरेश साबळे अखेर निलंबित आदेश निघाला तर बीड जिल्हा रुग्णालयाचा कारभार डॉ नागेश चव्हाण यांच्या कडे कर्मचारी वर्ग आनंदाने भारावून गेला

बीड जिल्हा रुग्णालयातील कोवीड कार्यकाळात कोवीड खर्चाचा साहित्य खरेदीत भ्रष्टाचार, लोखडी सावरगाव येथील आरोग्य कर्मचारी भरती प्रक्रियेत घोटाळा उघडकीस आला आणि तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुरेश साबळे यांच्या वरती महाराष्ट्र राज्याच्या सर्वोच्च सभागृहात म्हणजे पावसाळी अधिवेशनामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी डॉ सुरेश साबळे यांनी केलेल्या घोटाळ्यामध्ये व भ्रष्टाचार संदर्भात आरोग्य कर्मचारी भरती प्रक्रियेत घोटाळा संदर्भात प्रश्न उपस्थित केला यावेळी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी उत्तर देताना थेट तडकाफडकी निलंबित करण्यात आल्याची घोषणा करत सभापती श्री नीलम ताई गोरे यांच्यासमोर उत्तर देत घोषणा केली यावेळी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी संबंधित डॉक्टर सुरेश साबळे यांच्या वर तीन तीन विभागिय डी ओपन झालेले आहेत यामध्ये मगरूर डॉ सुरेश साबळे यांच्या निलंबनाची कारवाई करत आज डॉ सुरेश साबळे यांच्या निलंबनाची आॅर्डर काढून त्याना नांदेड येथील जिल्हा रुग्णालयातील मुख्यालयात हजर होण्याचे आदेश दिले यावेळी बीड जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुरेश साबळे यांच्या नंतर डॉ नागेश चव्हाण हे आता बीडचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक पदाची जबाबदारी संपूर्णपणे घेत पार पाडतील आरोग्य कर्मचारी आनंदात यांनी आनंद व्यक्त करत डॉक्टर नागेश चव्हाण यांचं स्वागत केले यामध्ये डॉ चव्हाण हे एक न्यायप्रविष्ट मनमिळाऊ स्वभावाचे व रूग्ण सेवक म्हणून ओळखले जातात

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या