10.9 C
New York
Wednesday, November 27, 2024

Buy now

spot_img
spot_img

सरस्वती विद्यामंदिर येथे अण्णाभाऊ साठे,लोकमान्य टिळक यांना अभिवादन

सरस्वती विद्यामंदिरात साहीत्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीचा संयुक्त कार्यक्रम संपन्न. बीड:-(प्रतिनीधी) – येथिल शिवाजीनगर भागातील सरस्वती विद्यामंदिरात साहीत्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीचा संयुक्त कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.सदरील कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.गोरे सर तर प्रमुख अतिथी म्हणून प्रशालेचे माजी विद्यार्थी तथा प्रशालेचे पालक श्री.बागल विठ्ठल सर तसेच सञ विभाग प्रमुख श्रीम.सांगळे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते. सदरील कार्यक्रमाप्रसंगी साहीत्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त तसेच कै.रामभाऊ मुळूक स्मरणार्थ घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण या प्रसंगी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सदरील कार्यक्रमास बीड शहरातील विविध शाळेचे शिक्षक , पालक व बक्षीसपात्र विद्यार्थी मोठ्या संख्येत ऊपस्थीत होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या