28.9 C
New York
Friday, June 14, 2024

Buy now

रुग्णसेवक शरद झोडगे यांच्या वाढदिवसानिमित्त सॅनिटरी पॅडचे वाटप

सामाजिक कार्यकर्ते तथा रुग्णसेवक शरद झोडगे यांच्या वाढदिवसानिमित्त सॅनिटरी पॅड चे वाटप

 

बीड दि.३० (प्रतिनिधी) बीड शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा रुग्णसेवक शरद झोडगे यांचा वाढदिवस अनेक सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.

 

जुना धानोरा रोड परिसरातील अस्मिता ब्युटी पार्लर येथे देखील त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी महिलांच्या संरक्षणार्थ महिलांना सॅनिटरी पॅड चे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन अस्मिता ब्युटी पार्लर च्या संचालिका सौ.सुरेखा मधुकर कांबळे यांनी केले होते.

वाढदिवसानिमित्त सॅनिटरी पॅड चे वाटप केल्याबद्दल महिलांनी शरद झोडगे यांचे आभार मानले. तसेच दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी प्रवीण पालीमकर, सातीराम ढोले, अशोक आठवले, विक्रम मोमीन, राज भैय्या गायकवाड, पत्रकार अंकुश गवळी, अमोल ढोले

अमोल शिंदे यांच्यासह स्थानिक भागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या