20.5 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

spot_img
spot_img

भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनविण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण- प्राचार्य सुनिता साखरे

भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनवण्यासाठी नविन शैक्षणिक धोरण – प्राचार्या सुनिता साखरे

 

गढीच्या नवोदय विद्यालयात नवीन शैक्षणिक धोरणांविषयी पत्रकार परिषद संपन्न

 

गेवराई :

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत शाळा आणि महाविद्यालयांमधील शिक्षणाचे धोरण तयार केले जाते. भारत सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० लागू केले असून त्याअंतर्गत सरकारने शैक्षणिक धोरणात अनेक मोठे बदल केले आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनवणे हा मुख्य उद्देश असल्याचे प्रतिपादन प्राचार्या सुनिता साखरे यांनी व्यक्त केले

गेवराई तालुक्यातील गढी येथील जवाहर नवोदय विद्यालयात शुक्रवार दि.२८ जुलै रोजी सकाळी ११.३० वा. नविन शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020 ) ला तीन वर्ष पुर्ण झाल्याने आयोजित पत्रकार परिषदेत नवोदय विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती सुनिता साखरे नवीन शैक्षणिक धोरणांविषयी बोलत होत्या यावेळी समवेत उपप्राचार्या श्रीमती.श्‍वेता मुन्‍नरवार, वरिष्‍ठ शिक्षक डी.व्‍ही.बडे, महेश रसाळ, डी.पी.पगार सह आदी उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत पुढे बोलताना प्राचार्या सुनिता साखरे म्हणाल्या की, नव्या शैक्षणिक धोरणात बदलत्या काळानुरूप काही सकारात्मक बदल करण्यात आले आहेत. विशेषत: उच्च शिक्षणामध्ये लवचिकतेवर, विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासावर, ज्ञानाधिष्ठित शिक्षणावर भर देण्यात आला आहे .विद्यार्थ्यांचा विकास व्हावा यासाठी शिक्षण पद्धतीत पूर्णपणे बदल करण्यात आले आहेत. नवे शैक्षणिक धोरण आपल्या देशातील मुलांच्या भविष्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. या धोरणांतर्गत मातृभाषेतून शिक्षण दिले जाते, माध्यमिक शाळेतून कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. जागतिक स्तरावर भारतीय शिक्षण व्यवस्था मजबूत केली जाईल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अनेक क्रांतिकारी सुधारणा होत आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत, विद्यार्थ्यांना मूल्यावर आधारित सर्वसमावेशक शिक्षण दिले जाईल, त्यांचा वैज्ञानिक स्वभाव विकसित केला जाईल आणि त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत अनेक नवीन निर्णय घेण्यात आले आहेत. जेणेकरुन शिक्षण अधिक चांगले होईल. रोजगारक्षम कौशल्य विकसन: प्रात्यक्षिक व अनुभवावर आधारित अध्ययन अध्यापनास प्रोत्साहन देण्याच्या धोरणामुळे रोजगारास सक्षम बनवणाऱ्या कौशल्यांचा विकास करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार असल्याचेही शेवटी बोलताना त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेच्या यशस्वीतेसाठी नवोदय विद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या