28.9 C
New York
Friday, June 14, 2024

Buy now

नजरेआड वाढदिवस,प्रचिती लोकनेत्याची- राम कुलकर्णी

*नजरेआड वाढदिवस, प्रचिती लोकनेत्याची*

—————————————————————————

भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा गोपीनाथ मुंडे यांचा वाढदिवस कालच्या 26 रोजी झाला. सोशल मिडियाद्वारे अगोदरच त्यांनी आवाहन करत माझ्याकडे कुणी येवु नका असे सांगितले. पण मी कुठे जाणार? हे सांगितलं नाही. 25 जुलैच्या मध्यरात्री चक्क त्या तीर्थक्षेत्र तिरूपती बालाजी मंंदिरात दिसुन आल्या. त्यामुळे साहजिकच त्यांना प्रत्यक्ष भेटायला कुणी जावु शकलं नाही. पण गंमत बघा, बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सेवाभाव कार्यक्रम संपन्न झाले. शालेय साहित्य वाटप, फळाचे वाटप तर जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनी बॅनर, जाहिरातबाजी केली. व्हॉटसअप, फेसबुक,इंस्टाग्राम हे सारं पाहिल्यानंतर तो दिवस केवळ पंकजाताईचा राहिला. नजरेआड वाढदिवस होता तरी लोकनेता काय असतो? याची प्रचिती कळुन चुकली. कारण समाजातील अठरापगड जातीधर्माच्या लोकांनी विशेषत: कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी घेतलेले कार्यक्रम आणि शुभेच्छाचा वर्षात यातुन दिसुन आला. चंगळवादाच्या डोहात बुडालेली नवी पिढी आगळ्यावेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करते. पण एक महिला नेतृत्व आपल्या आयुष्याचा शुभ दिन तीर्थक्षेत्रावर जावुन अनुष्ठान समर्पित करते. हा भाव खर्‍या अर्थाने आदर्श घेण्यासारखा म्हणावा लागेल.

वाढदिवसा निमित्त मुंबईला कुणी येवु नये. कारण मी भेटणारच नाही. अशा प्रकारचे आवाहन चार-आठ दिवस अगोदरच पंकजाताईंनी कार्यकर्ते आणि हितचिंतकांना केले होते. एव्हाना आम्ही येतच आहोत असं काही कौटुंबिक लोकांनी जीवाभावाचा आग्रह केला तरी देखील त्यांनी विरोध करत तुम्हाला आल्या माघारी परतावं लागलं मी भेटणार नाही या शब्दात त्यांनी सुचना केल्या. पण त्या जाणार कुठं? याचा थांगपत्ता कुणालाच नव्हता. तो दिवस त्यांनी सस्पेन्स ठेवला होता. उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अनेकांना वाटलं मुंबईत कुठं तरी चांगल्या ठिकाणी जेवणाला जातील तर अनेकांना वाटलं त्या घरीच असतील. कारण तिरूपतीला जातील याची कल्पना कुणी केली नव्हती. पण जेव्हा 25 जुलैच्या रात्री सोशल मिडियावर त्यांचे फोटो झळकले तेव्हा खरं तर आश्चर्याचा धक्का बसला. पण वर्तमान व्यवस्थेत वाढदिवस विशेषत: राजकारण्यांनी तीर्थक्षेत्रावर साजरा करावा, अध्यात्मिक अनुष्ठान करत दिवस घालवावा असं पाहिलं नाही. पण ते दाखवुन प्रत्यक्ष त्यांनी दिलं. खरं तर परमेश्वरावर विश्वास असणार्‍या एव्हाना वारकरी संप्रदायातील लोकांना त्या कृतीचं खुप समाधान झालं. कारण माणुस राजकारणात कितीही मोठा झाला तरी देवापुढे लहान आणि दुसरी गोष्ट म्हणजे शुद्ध कर्माने आयुष्य जगताना परमेश्वराचा आशिर्वाद महत्वाचा असतो आणि तो घेण्यासाठी धडपड देखील करावी लागते? हे त्यांच्या तिरूपती दर्शनातून दिसुन आलं. दर्शनाचा कुठलाही गाजावाजा नाही. लेकरू आर्यमन एकटाच सोबत, तिथे देखील प्रेम करणारे हितचिंतक त्यांना भेटले. रात्री दर्शन रांगेत हात जोडून माऊलींना अनेकांना जेव्हा अभिवादन केलं तो निरागस फोटोसुद्धा जेव्हा सोशल मिडियावर झळकला तेव्हा डाव्या हातात असलेली पर्स सोबत आर्यमन आणि हात जोडलेले हा त्यांचा भाव ज्यामुळे अनेकांच्या डोळ्यांत आश्रु आले. कारण या नेतृत्वावर सर्वसामान्य माणुस आणि कार्यकर्ते जीवाभावाने प्रेम करतात. जेव्हा हितचिंतक कार्यकर्ते र्‍हदयातुन प्रेम करतात, त्यावेळी नेतृत्वाच्या प्रत्येक कृतीचं भावस्पर्श नवल वाटत असतं. कदाचित तिरूपती बालाजी भविष्यात या नेतृत्वाला आशिर्वाद देईल पण तिथं गेल्याच्या नंतर त्यांनी परिसरात असलेले इतर देवाधिकांचंही मनोभावे दर्शन घेतले. विधिवत पुजा केली. त्या दरम्यान महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील जीवाभावाचे हजारो माणसं त्यांना भेटली. प्रत्येकांचा भाव त्यांनी स्वत:च्या डोळ्यात टिपला.

कालचा वाढदिवस तसं पाहता कार्यकर्ते आणि हितचिंतकासाठी नजरेआडच होता. अलीकडच्या काळात या निमित्ताने हजारो कार्यकर्ते नेतृत्व जिथं आहे तिथं जातं. पण काल जाता आलं नाही. तरीसुद्धा बीड जिल्ह्यात न भुतो न भविष्यति सेवा कार्यक्रम झाले. अगदीच म्हटलं तर आष्टी, पाटोदा, शिरूर, बीड, केज, चौसाळा, धारूर, वडवणी, माजलगाव,परळी, अंबाजोगाई, तेलगाव, पाथरूड, गंगामसला, धर्मापुरी, युसुफ वडगाव, नांदुरघाट या सर्व ठिकाणी जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनी आर्थिक खर्च करून सामाजिक कार्यक्रम घेतले. उदा.शालेय साहित्य वाटप, रूग्णांना फळवाटप, मंदिर,मस्जिदमध्ये जावुन पुजाविधी तर कुणी गोरगरिबांना रेनकोट साड्यांचे वाटप केले. केवळ बीड जिल्ह्यातच झालं का? तर असे नव्हे. नगर, पाथर्डी, शेवगाव, संभाजीनगर, गंगाखेड, बुलढाणा, सिंदखेडराजा,कोल्हापूर, कळंब, धाराशिव, लातुर आदी सर्व मोठ्या मोठ्या शहरातून देखील भरगच्च कार्यक्रम झाल्याच्या बातम्या पहायला मिळाल्या. वर्तमानपत्र, इलेक्ट्रॉनिक मिडिया यावर शुभेच्छा, जाहिरातींचा वर्षाव झाला. खरं तर पंकजाताई सत्तेत नाहीत त्यामुळे कार्यकर्त्यांची आर्थिक परिस्थिती फार फायद्याची असंही म्हणता येणार नाही पण नेतृत्वाप्रती असलेली निष्ठा उघडपणे दाखवण्यासाठी जीवाभावाचे लोक आणि कार्यकर्ते मागे रहात नाहीत हे दिसुन आलं. लोकनेता अर्थात समाजातील अठरापगड जातीधर्माच्या वंचित, उपेक्षित, शेतकरी, कष्टकरी, दीनदलित, गोरगरीब यांच्या र्‍हदयावर जो राज्य करतो त्याला लोकनेता म्हणतात आणि तशा वेळी नेतृत्वाच्या शुभ दिनी भावनेची होणारी गर्दी त्यातुन लोकनेता प्रकटन हे पंकजाताईच्या बाबतीत दिसुन आलं. वाढदिवस नजरेआड होवुनसुद्धा बीड जिल्ह्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते रस्त्यावर होते हे विशेष. खरं तर सत्ता पदाच्या काळात ज्यांनी घरं भरले असे अनेक कुठे बिळात लपले? कुणास ठावुक? पण जीवाभावाचे ज्यांचा काही कवडीचा फायद्याही नाही, जे साहेबांवर आणि नंतर ताईसाहेबांवर प्रेम करतात असे सामान्य कार्यकर्ते मात्र घडेल तसं वाढदिवसाच्या उत्सवात पुढे आलेले दिसले. कधी कधी राजकिय नेतृत्वाने सुद्धा राजकारणात काम करताना वजाबाकी करायला शिकायला हवं. बाकी काही असलं तरी नजरेआड वाढदिवस तरी प्रचिती लोकनेत्याची हे कालच्या दिवसभराच्या वाढदिवस उत्सवातुन दिसुन आले. सोशल मिडियावर एक दिवस याच नेतृत्वाचा होता. राज्यातील विविध पक्षाच्या मान्यवर नेत्यांनी आपआपल्या परीने सोशल मिडियावर दिलेल्या शुभेच्छा, पक्ष नेतृत्वाकडून मिळालेल्या शुभेच्छा एव्हाना इतर राज्यातुन देखील मान्यवरांकडून आलेल्या शुभेच्छा हे पाहिल्यानंतर नेतृत्वाचं मोठेपण देखील लक्षात आल्याशिवाय रहात नाही.

देवाचिया द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधियेल्या

हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा,पुण्याची गणना कोण करी?

– राम कुलकर्णी

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या