25.6 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

spot_img
spot_img

माजी सैनिकांच्या ताब्यातील गट नं662जमीन शिवणी येथील घरशेड पाडून वस्तू सामग्री चोरून नेल्याची तक्रार करून प्रशासन कारवाई का?करत नाही माजी सैनिक प्रकाश वाघमारे

माजी सैनिकाच्या ताब्यातील गट नं. ६६२ जमीन शिवणी येथील घर शेड पाडुन वस्तु सामुग्री चोरुन नेल्याची तक्रार करुन प्रशासन कारवाई का ? करत नाही-

माजी सैनिक प्रकाश वाघमारे

बीड प्रतिनिधी – मौजे शिवणी गट- ६६२ ही जमिन नावे असणाऱ्या व्यक्तीचा व प्रशासनाचा या जमिनीत घोटाळा आहे, या प्रकारच्या विरुध्द माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांनी गेल्या १२ वर्षा अगोदर पासुन प्रशासनाकडे तक्रारी अर्ज केले आहेत जानु बुधा कोरडे या नावाने गट ६६२ मध्ये ५ एक्कर जमिन नावे असल्याची नोंद असून मोचीपिंपळगाव येथे गट नं २७४ मध्ये ५ एवकर च्या पुढे जालिंदर बुधा कोरडे अशी जमीनीची नोंद आहे दोन्हीकडे वेगवेगळी नावे लावुन हा सावळा गोंधळ चालु आहे. दोन्ही ठिकाणची जमीन गायरान आहे एक कुंटुंबाला किंवा एक व्यक्तीला असा डबल / दुहेरी लाभ देता येत नाही हा कायद्याचा नियम आहे.

गट नं – ६६२ शिवणी येथिल जमीन हस्तांतर करण्याचा अहवाल मंडळ अधिकारी यांनी देवुन कळविले आहे की, ही जमीन मांझी सैनिक प्रकाश वाघमारे यांना देण्यात यावी तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. परंतु येथील प्रशासन कार्यवाही करत नाही, “असाच वेगळा प्रकार” गट न. ६६२ मध्ये आहे. पिराजी दगडु कोरडे हे १९९५ ला मयत झाले असतांना त्यांचे मयत प्रमाणपत्र २००६ चे दाखवुन २०१६ ला १० वर्षाच्या आत वारस हक्क सादर केल्याचा खोटा दिखावा करुन फेरफार सुमित्रा आश्रुबा मिसळे या महिलेने केला या महिलेला दोन भाऊ असतांनी त्यांना अंधारात ठेवुन व त्यांना वारस न दाखवता फेरफार केला आहे. तसेच या महिलाचे वडील पिराजी यांच्या नावे, सेवा सोसायटीचा संस्थेचा बोजा मयत नंतर दाखवला आहे. या महिलाच्या नावे मौज येथे जमीन असतांनी सरकारी जमीन फेरफार करणे योग्य नाही ही जमीन प्रशासनाने वापस घेणे कायद्याचे आहे. या घोटाळ्याची तक्रार असल्याने सदरील महिला माजी सैनिक वाघमारे यांच्या ताब्यातील जमीनीत हस्तक्षेप विनाकारण करुन त्रास देत आहे. माजी सैनिकाने गट नं ६६२ शिवणी येथिल जमीनीचा ताबा घेतला आहे. पडीक जमिन जे. सी. बी ने खोदुन सुपीक केली आहे. तसे शासन प्रशासनास कळविले आहे.

दि.०८/०७/२०२३ रोजी उल्लेखीत नावाच्या कुंटुंबात व वाघमारे यांच्यात भांडणे झाली माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांच्या कानाला मार लागल्याने ते सरकारी दवाखान्यात अॅडमिट होते याच दरम्यांन दि.१०/०७/२०२३ रोजी जानु कोरडे व सुमित्रा मिसळे यांनी माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांचे घर शेड पाडले पब्लीक ॲप वर बातमी आली ते घर शेंड पाडण्याचा व्हिडोओ व्हायरल

झाला प्रशासनास कळविले परंतु आतापर्यंत प्रशासनाने कारवाई केली नाही हि शोकांतीका आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या