वंचितचे अशोक हिंगे यांनी बैठकीत केले मार्गदर्शन
बीड प्रतिनिधी – माँसाहेब जिजाऊ मल्टीस्टेट ठेवीदारांचा आशिर्वाद लॉन्स येथील बैठकीला वंचितच्या अशोक हिंगे यांनी केले. मार्गदर्शन बीड शहरातील जिजाऊ मासाहेब मल्टीस्टेट यांच्या ठेवीदाराची आशीर्वाद लॉन्स येथे व्यापक घेण्यात आली या बैठकीला ठेवीदार आप्पासाहेब जगताप, मारुती तिपाली, अँड.रवी देशमुख, सुशील सरपते यांच्यासह हजारो ठेवीदार उपस्थित होते.
या बैठकीला सर्वनामते दिनांक 19 जुलै रोजी भव्य मोर्चा चे आयोजन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून बीड शहरातील मुख्य रस्त्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य असा मोर्चा काढण्यात येणार आहे यामध्ये सर्व भागातील व शहरी भागातील देवीदारांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
आज झालेल्या बैठकीमध्ये एक समन्वय समिती देखील स्थापन करण्यात आल्याची माहिती सांगण्यात येत आहे. लोकशाही मार्गाने ही मागणी केली जाणार आहे त्यामध्ये पोलीस प्रशासन महसूल प्रशासन व न्याय प्रशासन यांच्या लक्षामध्ये ठेविधानांची झालेली फसवणूक आणून देण्यासाठी हा विराट मोर्चा होत आहे. व या नंतर दिल्ली व मुंबई येथे देखील या अनुषंगाने निवेदने देऊन न्याय हक्कासाठी भेटीगाठी घेतल्या जाणार असल्याची माहिती या बैठकीत सांगण्यात आली आहे.