1.4 C
New York
Tuesday, February 18, 2025

Buy now

spot_img
spot_img

शहागड येथे रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या ट्रकला आयशर टेम्पोची धडक

◼️गेवराई तालुक्यातील माटेगाव येथील तरुणासह अन्य एकाचा जागीच मृत्यू

गेवराई महाराष्ट्र आरंभ वृत्त (नवनाथ आडे) : राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला उभा असलेल्या ट्रकला आयशर टेम्पो पाठीमागून जोरात धडकला. या भिषण अपघातात आयशरचा चालक व ट्रकचा किन्नर जागीच ठार झाल्याची घटना काल मंगळवारी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील शहागड येथे रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. राम बळीराम गरुड (वय २५) वर्ष) रा.माटेगाव ता. गेवराई जि.बीड व हसन झाकीर हुसेन (वय २३) रा‌. जलालपुर हरियाणा असे अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत.

शहागड येथे धुळे-सोलापूर महामार्गालगत असलेल्या कुरेशी हार्डवेअर समोर टायरमधील हवा चेक करण्यासाठी राजस्थान राज्यातील ट्रक क्रंमाक (आर.जे.१४- जी.के.२७५८) हा चालकांने थांबवला होता. यावेळी ट्रकचा किन्नर हसन झाकीर हुसेन हा ट्रकच्या पाठिमागे जावून टायर तपासणी करीत असतानाच पाठीमागून भरधाव आलेला आयशर (क्र.एम.एच.११ ए.एल.३५१०) हा ट्रकवर अचानक येऊन जोरात धडकला. या अपघातात किन्नर हसन झाकीर हुसेन हा दोन्ही गाड्यांच्या मध्येभागी सापडून जागीच ठार झाला. तर आयशरचा चालक राम गरुड हा तरुण देखील या अपघातात जागीच ठार झाला. हा अपघात एवढा भिषण होता की, यामध्ये आयशर टेम्पोच्या पुढील भागाचा चुराडा होऊन तो पुर्णतः ट्रकमध्ये घुसला होता.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच शहागड पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक इब्राहिम शेख, जमादार गणेश मुंडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन क्रेनच्या सहाय्याने ट्रकमध्ये घुसलेला आयशर बाजूला करुन दोन्ही मृताचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. बुधवारी सकाळी डाँक्टरांनी शवविच्छेदन केल्यानंतर माटेगाव येथे राम गरुड या तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या