22.8 C
New York
Monday, April 28, 2025

Buy now

spot_img
spot_img

छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा ११ वा गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.

आज छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा ११ वा गळीत हंगाम सन २०२४-२५ चा शुभारंभ करण्यात आला.

माजलगाव, सुनिल थोरात: माजलगाव तालुक्यातील महत्त्वाचा मानला जाणारा छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा ११ वा गळीत हंगाम सन २०२४-२५ चा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन मा.आ.बाजीराव (भाऊ) जगताप व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. शेतकरी बांधवांचे हित डोळ्यासमोर ठेऊन कारखान्याची नेत्रदीपक वाटचाल सुरू आहे.या कारखान्याने अत्यंत वेगाने प्रगती करत वरचेवर क्रसिंग मध्ये वाढ होताना दिसत आहे.याचा फायदा शेतकरी, ऊसतोड कामगार यांना होताना दिसत.तसेच शेतकऱ्यांना खूप मोठा प्रश्न पडायचा आपला ऊस कोण नेतो का नाही पण छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून हा प्रश्न मिटला आहे यामुळे शेतकरी चिंतेतून मुक्त झाला आहे

 

या कार्यक्रमावेळी कारखान्याचे सर्व संचालक, ऊस उत्पादक शेतकरी, नेते मंडळी, कारखान्याचे सर्व खाते प्रमुख, विभाग प्रमुख, कर्मचारी, वाहतूक ठेकेदार व नागरिकझ पत्रकार बांधव, कार्यकर्ते उपस्थित होते.

 

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या