11.8 C
New York
Tuesday, November 26, 2024

Buy now

spot_img
spot_img

आ. विजयसिंह पंडितांनी स्वाभिमानी मतदारांना केला विजय समर्पित.

आ. विजयसिंह पंडितांनी स्वाभिमानी मतदारांना केला विजय समर्पित.

गेवराई : कार्यकर्त्यांचे परिश्रम, आदरणीय भैय्यासाहेब यांचे परफेक्ट नियोजन आणि मतदारांचा विश्वास यामुळे मला विजय मिळाला. आजचा विजय मी गेवराई विधानसभा मतदारसंघातील तमाम स्वाभिमानी मतदारांना समर्पित करत आहे, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित आमदार विजयसिंह पंडित यांनी व्यक्त केली. तर या विजयामुळे आजवरचे सर्व राजकीय हिशोब चुकते केले आहेत. आदरणीय शिवाजीराव दादांचे स्वप्न साकारले आहे. मोठी जबाबदारी मतदारांनी दिली आहे, ती सार्थ करण्याचा नक्की प्रयत्न करणार असल्याची भावना जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांनी व्यक्त केली. गेवराई विधानसभा मतदारसंघातून विजयसिंह पंडित यांचा मोठा विजय झाल्यानंतर ते बोलत होते. गढी पासुन ते गेवराई शहरात भव्य मिरवणूक काढून कार्यकर्त्यांनी हा आनंदोत्सव साजरा केला. विजयसिंह पंडित यांनी मतदारांसह सर्व नेते व कार्यकत्यांचे मनापासून आभार व्यक्त केले.

गेवराई विधानसभा मतदारसंघासाठी झालेल्या मतमोजणी साठी प्रारंभी पासूनच विजयसिंह पंडित यांनी मोठी आघाडी घेतली होती, ती शेवटपर्यंत कायम ठेवली आणि प्रत्येक फेरीअखेर ती वाढतच गेली. विजयसिंह पंडित यांना एकूण १,१६, १५१ मते मिळाली असून त्यांनी ४२,३९० च्या लीडने विजय मिळवला. मतमोजणी दरम्यान कार्यकर्ते आणि मतदार यांनी मोठा जल्लोष केला. गढी येथील मतमोजणी केंद्रापासून नवनिर्वाचित आमदार विजयसिंह पंडित यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. गेवराई शहरात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करून आनंदोत्सव साजरा केला. नवनिर्वाचित आमदार विजयसिंह पंडित यांनी हा विजय स्वाभिमानी मतदारांना समर्पित केला आहे. कायम जनतेच्या सेवेत राहणार असल्याचे सांगून त्यांनी या निवडणूकीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. यावेळी बोलताना आ. विजयसिंह पंडित म्हणाले की, माझ्या विजया मध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे, ना. धनंजय मुंडे, भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांच्यासह मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदार बंधू-भगिनींचा मोठा वाटा आहे. मला तुम्ही भरभरून आशीर्वाद दिला. मतदारसंघांमध्ये माझ्या विरोधात खूप मोठ्या प्रमाणावर अपप्रचार झाला, जात- पात-धर्म यामध्ये मला अडकवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु माय-बाप मतदारांनी या पलीकडे जाऊन मला आशीर्वाद दिले. कार्यकर्त्यांनी आपणच उमेदवार आहोत,या भावनेतून काम केल्यामुळे मी हा विजय मिळवू शकलो. शिवछत्र परिवार जात-पात धर्म यापलीकडे जाऊन काम करतो, हे तुम्ही या निमित्ताने दाखवून दिले आहे. यापुढील काळात आपण सकारात्मक काम करुन मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे सांगून गेवराई विधानसभा मतदारसंघातील या सर्व समाजातील मतदार बांधवांनी माझ्यावर जो विश्वास टाकला त्याला मी अजिबात तडा जाऊ देणार नाही. येणाऱ्या पाच वर्षांमध्ये मला मिळालेल्या संधीचे मी सोने करेल, असेही आ. विजयसिंह पंडित यांनी यावेळी सांगितले. यावेळी बोलताना माजी आमदार अमरसिंह पंडित म्हणाले की गेवराई विधानसभा मतदारसंघातील तमाम मतदार बंधू-भगिनींनी विजयवर विश्वास टाकला, त्याबद्दल त्यांचे मी जाहीर आभार मानतो. आ. विजयसिंह पंडित यांचा हा बिजय ऐतिहासिक आहे. या विजयामुळे मला मनस्वी आनंद होतो आहे. आज १९९५ च्या निवडणुकीची मला आठवण झाली. आज या निमित्ताने सगळे हिशोब चुकते झाले. निवडणुकीच्या निमित्ताने दिलेला शब्द पूर्ण करण्याचा विश्वास देतो. या ऐतिहासिक निकालामुळे शिवछत्र परिवाराच्या सातबारावर तुम्ही तुमचे नाव कोरले आहे, तेव्हा यापुढे विकासाची कामे तर होतीलच, परंतु सामान्य माणसांना कोणताही त्रास होणार नाही, याची निश्चितच खबरदारी घेतली जाईल, असेही ते यावेळी म्हणाले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या