4.7 C
New York
Friday, November 29, 2024

Buy now

spot_img
spot_img

मोमीन पुऱ्यातील घड्याळाचा गजर संपूर्ण जिल्ह्यात घुमला पाहिजे – जयदत्त क्षीरसागर

बीड, महाराष्ट्र आरंभ वृत्त : मोमीनपुरा परिसर नेहमीच माझ्या पाठीशी राहिला आहे, आणि त्याच परिसराने मला ताकद दिली आहे. हीच ताकद आता योगेश क्षीरसागरच्या पाठीशी उभी राहावी, अशी अपेक्षा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून त्याचा गजर संपूर्ण बीड जिल्ह्यात घुमला पाहिजे.

जी.एन. फंक्शन हॉलमध्ये आयोजित भव्य सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून जगदीश काळे, विलास बडगे, नवी दुजांमा, हाफिज साहब, मुखीद लाला, वाजिद कुरेशी, हरून हाजी साब, आणि खलील हाफिज यांची उपस्थिती होती.

लोकशाही आणि मतदारांची भूमिका

जयदत्त क्षीरसागर यांनी पुढे बोलताना मतदारांना उद्देशून सांगितले की, “समस्या अनेक आहेत, पण त्या सोडवण्यासाठी संविधानिक पदाची गरज असते. निवडणुका सत्ता येण्यासाठी किंवा जाण्यासाठी नसतात, तर आपल्या समस्या कोण सोडवेल यासाठी असतात. गेल्या पाच वर्षांत चुकीच्या निर्णयांचे परिणाम आपण अनुभवले आहेत. त्यामुळे यावेळी योग्य उमेदवार निवडणे महत्त्वाचे आहे.

मी कधीच मुस्लिम समाजापासून अंतर ठेवले नाही. आपले नाते विश्वासाचे आणि प्रेमाचे आहे, जे मी कधीच ढळू देणार नाही. आपले मत अमूल्य आहे; त्याचा वापर विचारपूर्वक करावा. आम्ही वाळूचा ठेका, गुटखा विक्री किंवा क्लब चालवण्यास इच्छुक नाही. आम्ही जनसेवेसाठी कटीबद्ध आहोत. या उद्दिष्टांसाठी माझ्या नेतृत्वाखाली योगेश क्षीरसागर काम करेल, याची मला खात्री आहे.”

मुस्लिम समाजासाठी आवाहन

यावेळी नवी दुजांमांनी मुस्लिम समाजाला आवाहन केले की, “भावनिक वातावरण निर्माण करून हिंदू-मुस्लिम द्वेष पसरवण्याचा प्रयत्न होईल. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. समस्यांचे निराकरण करणाऱ्या उमेदवारालाच मतदान करा. जयदत्त अण्णा क्षीरसागर यांनी नेहमीच आपला साथ दिला आहे. योगेश क्षीरसागर हे तरुण, हुशार, आणि विकासशील दृष्टिकोन असलेले उमेदवार आहेत. त्यांना पाठिंबा देणे, म्हणजे आपल्या समाजाच्या विकासाला पाठिंबा देणे आहे.यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित मतदारांनी कार्यक्रमाला प्रतिसाद दिला आणि जयदत्त क्षीरसागर यांच्या आवाहनाला पाठिंबा व्यक्त केला.

घड्याळ चिन्हाला मतदान करा, विकासाला चालना द्या!

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या